Breaking-newsराष्ट्रिय
भूतानच्या पंचवार्षिक योजनेसाठी भारताची ४५०० कोटींची मदत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/Untitled-12.jpg)
- लोटे त्सेरिंग द्वीपक्षीय चर्चेसाठी भारत दौऱ्यावर
भारताने भूतानला ४५०० कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली असून, त्या देशाच्या बाराव्या पंचवार्षिक योजनेसाठी ही मदत करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे भूतानी समपदस्थ लोटे त्सेरिंग यांनी द्विपक्षीय चर्चा केली.
मोदी यांनी सांगितले, की भूतानबरोबर जलविद्युत सहकार्य हा महत्त्वाचा भाग असून, तो दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंधांचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे मंगदेच्छू प्रकल्प लवकरच सुरू करण्यात येईल.
त्सेरिंग यांचे गुरुवारी पहिल्या परदेश भेटीवर आगमन झाले. त्यांनी गेल्या महिन्यात भूतानचे पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेतली आहेत. मोदी यांनी सांगितले, की भारत हा भूतानचा विश्वासू मित्र असून तेथे महत्त्वाची भूमिका पार पाडील यात शंका नाही. भारताने त्यांच्या बाराव्या पंचवार्षिक योजनेसाठी ४५०० कोटी रुपये मदत जाहीर केली आहे. भूतानने या वर्षी नवी पंचवार्षिक योजना सुरू केली असून, तिची मुदत २०२२ पर्यंत आहे. दरम्यान, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी त्सेरग यांची आज सकाळी भेट घेतली. त्यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे घेतल्याबाबत त्यांचे अभिनंदन केले. त्सेरिंग यांनी महात्मा गांधी यांच्या समाधीवर राजघाट येथे पुष्पचक्र वाहिले.