लोक काय चर्चा करतात, याचा मी विचार करत नाही – विराट
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/ajinkya-and-virat-.jpg)
मेलबर्न– मैदाना बाहेर लोक माझ्या बद्द्लअ काय चर्चा करतात किंवा त्यांना काय वाटते याचा विचार मी करत बसत नाही. किंवा लोकांना मी कसा आहे हे लोकांना जाऊन सांगू इच्छीत नाही असे वक्तव्य भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दरम्यान होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यापुर्वी केले आहे.
दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीवर त्याच्या मैदानातील आक्रमक स्वभावामुळे टीकेचा सामना करावा लागला होता. तिसऱ्या कसोटीपुर्वी प्रसारमाध्यमांमध्ये आपल्या स्वभावावरुन होत असलेल्या टीकेबद्दल विराटला विचारले असता, विराटने मी कोण आहे हे लोकांना सांगत बसायची गरज वाटत नाही असं म्हटलं आहे. पुढे बोलताना तो म्हणाला मी कसा आहे किंवा मैदानात मी कसा वागतो हे मी लोकांना बाहेर जाऊन सांगणार नाही, मुळात मला त्याची गरज वाटत नाही. या सर्व गोष्टी मैदानाबाहेर घडत असतात.
लोक त्या बाबद बाहेर काय चर्चा करतायत यावर मी नियंत्रण ठेऊ शकत नाही. हा प्रत्येकाने समजून घेण्याचा मुद्दा आहे. माझ्यासमोर तिसरा कसोटी सामना जिंकण्याचे एकमेव लक्ष्य आहे, याव्यतिरीक्त मला कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रीत करायचं नाहीये. बॉक्सिंग डे कसोटीआधी पत्रकारांशी संवाद साधत असताना विराटने आपली बाजू मांडली.