चिखलीत दहा लाख रुपयांचे गोमांस पकडले, दोघांना अटक
पिंपरी ( महा ई न्यूज ) – बंद टेम्पोमध्ये दहा लाख रुपये किमतीचे गोमांस घेऊन जात असल्याची खबर एका सामाजिक कार्यकर्त्यास मिळाली. त्यानुसार चिखली पोलिसांनी सापळा रचून गोमांस घेऊन जाणारा टेम्पो पकडला. शुक्रवारी ( दि. 21) पहाटे तीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी शिवशंकर राजेंद्र स्वामी (25, रा. शिवाजीनगर, पुणे ) यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार, मोहम्मद सलाउद्दीन मोहम्मद शाबुद्दीन कमलापूर (वय 24), ऐहसान इद्रिस कुरेशी (19, दोघे रा. कुर्ला, मुंबई) यांना अटक करण्यात आली आहे. फिर्यादी स्वामी यांना एका टेम्पोतून गोमांस विक्रीसाठी जात असल्याची खबर मिळाली. त्यांनी ही माहिती चिखली पोलिसांना दिली. त्यानुसार चिखली पोलिसांनी देहू- आळंदी रस्त्यावर सापळा रचून टेम्पो ताब्यात घेतला. टेम्पोमध्ये 10 लाख रुपये किंमतीचे गोमांस मिळाले आहे. आरोपींवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास चिखली पोलिस करीत आहेत.