‘सिम्बा’मध्ये आणखी एका गाण्याचा रिमेक, ‘तेरे बिन’ गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/simba-1.jpg)
चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीचा बहुचर्चित ‘सिम्बा’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता रणवीर सिंग आणि सारा अली खान मुख्य भूमिकेत झळकणार आहे. काही दिवसापूर्वी या चित्रपटातील ट्रेलर आणि ‘आंख मारे’ हे पहिलं गाणं प्रदर्शित झालं होतं. ‘आंख मारे’ला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता. पहिल्या गाण्याच्या लोकप्रियतेनंतर चित्रपटातील दुसरं गाणंही आज प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
‘सिम्बा’मधलं ‘तेरे बिन’ हे नवं गाणं प्रदर्शित झालं असून यामध्ये रणवीर आणि साराची उत्तम केमिस्ट्री दिसून येत आहे. या गाण्यात सारा अत्यंत सुंदर आणि सिंपल दिसत असल्यामुळे तिच्या सौंदर्याची अनेकांना भूरळ पडली आहे. विशेष म्हणजे हे गाणं नुसरत फतेह अली खान यांच्या ‘तेरे बिन’ या गाण्याचा रिमेक आहे.
दरम्यान, ‘सिम्बा’मधील ‘तेरे बिन’ या गाण्याला राहत फतेह अली खान, असीस कौर आणि तनिष्क बागची यांचा आवाज लाभला आहे. तर रश्मी विरागने ते शब्दबद्ध केलं आहे. त्याप्रमाणेच तनिष्का बागचीने संगीतबद्ध केलं आहे.
काही दिवसापूर्वीच या चित्रपटातील ‘आंख मारे’ हे गाणं प्रदर्शित झालं आहे. हे गाणंदेखील रिमेक असून अभिनेता अर्शद वारसीचं लोकप्रिय गाणं ‘आंख मारे ओ लडकी आंख मारे…’या गाण्याचं ते रिमिक्स व्हर्जन आहे. रिमिक्स करण्यात आलेल्या या गाण्याला मिका सिंग आणि नेहा कक्कड यांच्या स्वरांचा साज चढला आहे. तर मुळ गाण्याला कुमार सानू यांचा आवाज लाभला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर ‘सिम्बा’मधील ही दोन्ही गाणी चांगलीच लोकप्रियता मिळवत आहेत. त्यामुळे रोहित शेट्टीचा हा बहुचर्चित ठरत असलेला चित्रपट येत्या २८ तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.