हे दहा ठरले २०१८ मधले सुपरहिट चित्रपट
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/best-of-2018.jpg)
बॉलिवूडसाठी २०१८ हे वर्ष खूप महत्त्वाचं ठरलं, या वर्षांत ‘पद्मावत’, ‘रेस’, ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ सारखे अनेक मोठे चित्रपट प्रसिद्ध झाले. विशेष म्हणजे या संपूर्ण वर्षात कमी बजेट असलेल्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर बाजी मारली. आईएमडीबी या संकेतस्थळानं अशाच काही २०१८ मध्ये सुपरहिट ठरलेल्या चित्रपटाची यादी जाहीर केली आहे. या संकेतस्थळाद्वारे प्रेक्षकांचा कल आणि पसंती लक्षात घेऊन सर्वोत्तम दहा चित्रपटांची यादी जाहीर करण्यात आली यात आयुषमान खुरानाचा ‘अंधाधून’ चित्रपट पहिल्या स्थानावर आहे.
ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं १५० कोटींहून अधिकची कमाई केली. पण त्याचबरोबर या चित्रपटात आयुषमान, तब्बू आणि राधिका आपटेच्या भूमिकेचंही खूप कौतुक करण्यात आलं होतं. ‘अंधाधून’नंतर दुसऱ्या स्थानी दाक्षिणात्य चित्रपट ‘रातचसन’ आहे. त्यानंतर ‘९६’, ‘मेहनती’ अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी आहे. पाचव्या स्थानी आयुषमान खुरानाचा ‘बधाई हो’ चित्रपट आहे.
तर सहाव्या स्थानी अक्षय कुमारचा पॅडमॅन हा चित्रपट आहे. त्यानंतर श्रद्धा कपूर , राजकुमार राव यांच्या ‘स्त्री’नंही या यादीत आपलं स्थान मिळवलं आहे. आलिया भट्टचा ‘राझी’ य़ा यादीत नवव्या तर रणबीर कपूरचा ‘संजू’ दहाव्या स्थानी आहे.