Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

‘गनमास्टर जी९’मधील अवनीत कौरच्या आयटम साँगमुळे सोशल मीडियावर वाद!

Avneet Kaur Item Song | अभिनेता इमरान हाशमी आणि जिनिलिया देशमुख यांचा मुख्य भूमिका असलेला ‘गनमास्टर जी९’ (Gunmaster G9) हा चित्रपट नुकताच सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून आणि सोशल मीडियावर संमिश्र प्रतिसाद मिळत असून, इमरान हाशमी व जिनिलिया देशमुख यांची ऑन-स्क्रीन जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. मात्र, दुसरीकडे या चित्रपटातील अभिनेत्री अवनीत कौर हिच्या आयटम साँगमुळे नवा वाद निर्माण झाला असून नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

‘गनमास्टर जी९’ या चित्रपटातील ‘दिल के थिएटर में २०० करोड़ मारूंगी पिया’ हे गाणे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या गाण्यामध्ये अवनीत कौर डान्स करताना दिसत आहे. मात्र, गाण्याची कोरिओग्राफी आणि अवनीतचे डान्स स्टेप्स पाहून सोशल मीडिया युजर्सनी संताप व्यक्त केला आहे. यासोबतच काही नेटकऱ्यांनी इमरान हाशमी आणि २५ वर्षीय अवनीत कौर यांच्यातील वयाच्या अंतरावरूनही टीका केली आहे.

हेही वाचा

‘द भारत स्काउट्स अँड गाईड्स’च्या १३ व्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड

सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

या गाण्यावरून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर (ट्विटर) अनेक युजर्सनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. एका युजरने ट्वीट करत म्हटले की, “अवनीत कौर फक्त २५ वर्षांची आहे आणि या कशा डान्स स्टेप्स आहेत? अत्यंत विचित्र वाटत आहे, तिला असे आयटम नंबर्स करण्यासाठी का भाग पाडले जात आहे आणि या सगळ्याची गरजच काय होती?” तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने, “अवनीत कौरचे नवीन गाणे अत्यंत विचित्र आणि चुकीचे वाटले,” अशी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, या वादावर अद्याप अवनीत कौर किंवा चित्रपटाच्या टीमकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group