सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर भाजपचे निर्विवाद वर्चस्व; १९ पैकी १८ जागांवर विजय
सहकार विकास पॅनलचे नेत्रदीपक यश; मोहिते पाटील गटाला मोठा धक्का, अर्जुनसिंह मोहिते पाटील एकमेव विजयी

सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपप्रणीत सहकार विकास पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे. एकूण १९ जागांपैकी १८ जागांवर विजय मिळवत या पॅनलने बँकेवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.
या निवडणुकीत १० उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित नऊ जागांसाठी प्रत्यक्ष मतदान झाले. या नऊ जागांपैकी भाजपप्रणीत पॅनलने आठ जागांवर विजय मिळवला. आमदार सुभाष देशमुख यांचे पुत्र मनीष देशमुख यांनी मोहिते पाटील पॅनलचे अमोल शिंदे यांचा २० मतांनी पराभव केला.
हेही वाचा – पिंपरी चिंचवड विद्यापीठ मध्ये संविधान दिन उत्साहात
मोहिते पाटील कुटुंबातील अर्जुनसिंह मोहिते पाटील हे एकमेव उमेदवार विजयी झाले. त्यामुळे या निवडणुकीत मोहिते पाटील गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. या निकालामुळे सोलापूर जिल्ह्यात भाजपचे राजकीय वर्चस्व अधिक मजबूत झाल्याचे चित्र आहे.




