Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आकुर्डीच्या डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये ‘एसपीपीयू स्टार्टअप टॉक सिरीज – २.०’ उत्साहात संपन्न

पिंपरी-चिंचवड । आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिल (IIC) आणि एंटरप्रेन्योरशिप सेल (E-Cell) यांच्या वतीने ‘एसपीपीयू स्टार्टअप टॉक सिरीज – २.०’ या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

या उपक्रमास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) ‘सेंटर फॉर इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड एंटरप्रायझेस’ यांचे प्रायोजकत्व लाभले होते.

विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता आणि नवकल्पनांची (इनोव्हेशन) आवड निर्माण करणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटचे स्टार्टअप व इनक्युबेशन विभागप्रमुख प्रा. गुरुराज डांगरे आणि ‘इंटेलोबाईट’चे (IntelloByte) सह-संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कुणाल मुंजारे यांनी मार्गदर्शन केले.

हेही वाचा –  पिंपळे सौदागरमधील रखडलेले रस्ते, वाहतूक कोंडीवर संयुक्त पाहणी

प्रा. डांगरे यांनी १२० हून अधिक स्टार्टअप्सना मार्गदर्शन करण्याच्या अनुभवातून नवउद्योगांची उभारणी कशी करावी यावर मार्गदर्शन केले, तर श्री. मुंजारे यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ऑटोमेशन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने व्यवसाय कसा वाढवावा यावर सखोल विचार मांडले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निरज व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.

सह-निमंत्रक डॉ. पल्लवी चौधरी व डॉ. अनिकेत गरुड यांनी कार्यक्रमाचे नेतृत्व केले, तर समन्वयक डॉ. भाग्यश्री वरुडे आणि प्रा. कल्याणी चांदे यांनी विशेष परिश्रम घेतले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group