TOP News । महत्त्वाची बातमीउद्योग विश्व । व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बीड महावितरणमध्ये १३ कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप; सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई!

गेवराईतील विद्युत दुरुस्तीच्या कामांच्या निधीबाबत आमदार विजयसिंह पंडित यांची तक्रार; संबंधित एजन्सीवर कारवाई आणि दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

बीड : बीड जिल्ह्यातील महावितरणच्या विद्युत दुरुस्तीच्या कामांसाठी मंजूर झालेल्या निधीमध्ये सुमारे १३ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी करण्यात आलेल्या चौकशीनंतर महावितरणच्या सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी यासंदर्भात तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर ही कारवाई झाल्याचे सांगण्यात येत आहे.

आमदार पंडित यांच्या तक्रारीनंतर चौकशी; सहा जणांवर कारवाई

गेवराई विधानसभा मतदारसंघात विद्युत विषयक विविध दुरुस्तीच्या कामांसाठी आलेल्या सुमारे १३ कोटी रुपयांच्या निधीच्या वापराबाबत गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. आमदार विजयसिंह पंडित यांनी याप्रकरणी तक्रार दाखल करून चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर झालेल्या चौकशीत अनियमितता आढळल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणात बीड महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रेमसिंग राजपूत, कार्यकारी अभियंता सुबोध डोंगरे यांच्यासह अभियंता कुंभार, गोरे, प्रधान आणि गुंजाळ अशा सहा अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश देण्यात आल्याचे वृत्त आहे.

हेही वाचा –  आत्मविश्वास आणि एकाग्रता वाढवण्यासाठी करा ही ३ योगासने; मन राहील शांत आणि स्थिर!

संबंधित एजन्सीवरही कारवाईची मागणी

निलंबनाच्या कारवाईनंतर आमदार विजयसिंह पंडित यांनी संबंधित कामे करणाऱ्या एजन्सीवरही कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

आमदार विजयसिंह पंडित यांचा प्रशासनावर आरोप

निलंबनाच्या कारवाईनंतर आमदार विजयसिंह पंडित यांनी प्रशासनावर टीका केली. ही कारवाई केवळ वरवरची असून एका तालुक्यापुरती मर्यादित असल्याचा आरोप त्यांनी केला. गेवराईप्रमाणेच शिरूर कासार, पाटोदा आणि जिल्ह्यातील इतर भागांतही अशाच प्रकारचे गैरप्रकार झाल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकरणात काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत आपण शांत बसणार नसल्याचा इशाराही आमदार पंडित यांनी दिला आहे. दरम्यान, या प्रकरणातील गैरव्यवहाराचे नेमके स्वरूप, संबंधित एजन्सीची भूमिका आणि पुढील कारवाई याबाबत अधिकृत तपशील समोर येणे बाकी आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group