Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

पाचव्या वनडेत भारताचा न्यूझीलंडवर २२ धावांनी थरारक विजय! ३-१ ने वनडे मालिका खिशात

IND vs NZ 5th ODI Result | भारतीय क्रिकेट संघाने पाचव्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा २२ धावांनी पराभव करत पाच सामन्यांची वनडे मालिका ३-१ ने खिशात घातली आहे. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडिया अवघ्या २०९ धावांवर सर्वबाद झाली होती. मात्र, भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट लाईन-लेंग्थच्या जोरावर न्यूझीलंडला १८७ धावांवर रोखत हा थरारक विजय साकारला. या सामन्यात मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग यांनी शेवटच्या क्षणांत १० चेंडूत केलेल्या २६ धावा सामन्याचा खरा टर्निंग पॉईंट ठरल्या.

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. किवी गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर भारताची आघाडीची फळी पूर्णपणे कोसळली. कर्णधार रोहित शर्मा (७ धावा), विराट कोहली (५ धावा) आणि ऋतुराज गायकवाड (१८ धावा) स्वस्तात बाद झाले. त्यानंतर श्रेयस अय्यर (२२ धावा) आणि अक्षर पटेल यांनी ५२ धावांची भागीदारी करत डाव सावरला. अक्षर पटेल आणि इशान किशन या दोघांनीही प्रत्येकी ४६ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले, मात्र दोघांचेही अर्धशतक अवघ्या चार धावांनी हुकले. नमन धीरने २२ धावा जोडल्या. शेवटच्या टप्प्यात अर्शदीप सिंग (२ षटकार) आणि मोहम्मद सिराज (१ षटकार, १ चौकार) यांनी अवघ्या १० चेंडूत २६ धावांची स्फोटक खेळी करत भारताला २०९ धावांच्या सन्मानजनक टप्प्यावर पोहोचवले.

हेही वाचा

अमेरिकेतील मियामी विमानतळावर मोठी दुर्घटना टळली! धावपट्टीवर प्रवासी आणि मालवाहू विमानाची धडक; २ प्रवासी जखमी

अक्षर पटेलच्या फिरकीने फिरवला सामना

२१० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंडला भारतीय गोलंदाजांनी मोक्याच्या क्षणी धक्के दिले. न्यूझीलंडला विजयासाठी २२ चेंडूत २९ धावांची गरज असताना अक्षर पटेलने जेकब डफीला बाद करत किवी संघाला नववा धक्का दिला. त्यानंतर ४९व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक इशान किशनने ब्लेअर टिकनरला यष्टिचित (स्टंपिंग) केले आणि भारताच्या २२ धावांच्या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group