Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

MPSC परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांची चौकशी; निवेदने सादर करण्यासाठी २३ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

नऊ स्पर्धा परीक्षांमधील प्रश्नपत्रिका व उत्तरतालिका फुटी प्रकरणांची चौकशी; परीक्षार्थी आणि विद्यार्थ्यांना प्रतिज्ञापत्रे सादर करण्याचे आवाहन

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात आलेल्या नऊ स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहार तसेच प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका फुटीच्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या चौकशी आयोगाकडे निवेदने सादर करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर संबंधित व्यक्ती, परीक्षार्थी आणि विद्यार्थ्यांना आता २३ नोव्हेंबर २०२६ पर्यंत आपली निवेदने सादर करता येणार आहेत. यापूर्वी १६ नोव्हेंबर ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली होती.

या प्रकरणांशी संबंधित माहिती असलेल्या व्यक्तींनी तसेच परीक्षार्थी आणि विद्यार्थ्यांनी आयोगाने निश्चित केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या विहित नमुन्यात मराठी किंवा इंग्रजी भाषेत आपली निवेदने सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. निवेदनासोबत वैध ओळखपत्राची प्रत आणि संबंधित कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित प्रती जोडणे आवश्यक आहे.

हेही वाचा –  १ लाख ५१ हजार पणत्यांतून साकारली भगवान बिरसा मुंडांची भव्य प्रतिमा; नरहरी झिरवाळ यांच्याकडून कलाकारांचे कौतुक

तसेच स्वप्रमाणित प्रतिज्ञापत्र, निवेदन आणि संबंधित कागदपत्रांची एक प्रत आयोगाच्या [email protected] या ई-मेल पत्त्यावरही पाठवता येणार आहे. तक्रारी दाखल करण्यासंदर्भात आवश्यक माहिती किंवा मदतीसाठी ०२२-२०८६७६७७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.

२३ नोव्हेंबर ही अंतिम मुदत

२३ नोव्हेंबर २०२६ ही निवेदने स्वीकारण्याची अंतिम मुदत असून, त्यानंतर प्राप्त होणारी कोणतीही प्रतिज्ञापत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यामुळे सर्व संबंधितांनी विहित मुदतीत आपली प्रतिज्ञापत्रे सादर करावीत, असे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा चौकशी आयोगाचे सदस्य सचिव तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group