ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

PCMC । स्वीकृत नगरसेवक निवडीचा दहा महिन्यांचा तिढा सुटणार? २० नोव्हेंबरच्या सभेकडे लक्ष!

राष्ट्रवादी काँग्रेसची तीन नावे निश्चित, भाजपाकडून सात नावे आठवडाभरात सादर होण्याची शक्यता

पिंपरी- चिंचवड | पिंपरी-चिंचवड महापालिकेतील दहा स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीचा सुमारे दहा महिन्यांपासून रखडलेला प्रस्ताव २० नोव्हेंबरच्या तहकूब सर्वसाधारण सभेत मान्यतेसाठी येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या तीन उमेदवारांची नावे निश्चित केली असून, सत्ताधारी भाजपकडून उर्वरित सात जागांसाठी याच सभेत नावे सादर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप कोणाला संधी देणार आणि नियुक्त्यांवर याच सभेत शिक्कामोर्तब होणार का, याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.

महापालिका निवडणुकीत भाजपने ८४, तर राष्ट्रवादी काँग्रेसने ३६ जागा जिंकल्या होत्या. या संख्याबळानुसार स्वीकृत नगरसेवकांच्या दहा जागांपैकी भाजपला सात आणि राष्ट्रवादी काँग्रेसला तीन जागांवर संधी मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने माजी स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, राजेंद्र जगताप आणि फजल शेख यांची नावे निश्चित केली आहेत. भाजपची सात नावे अद्याप जाहीर झालेली नाहीत.

हेही वाचा

पुण्यातील प्रसिद्ध ‘वैशाली’ आणि ‘रूपाली’ हॉटेलचे परवाने निलंबित; अस्वच्छता आणि गंभीर त्रुटींमुळे एफडीएची मोठी कारवाई

विलंबामुळे इच्छुकांमध्ये नाराजी

स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीचा विषय गेल्या दहा महिन्यांत विविध कारणांनी पुढे ढकलला गेला. त्यामुळे इच्छुकांसह राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही नाराजी व्यक्त झाली होती. राष्ट्रवादीने निश्चित केलेल्या नावांमध्ये बदल व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचीही चर्चा होती. आता नियुक्तीचा प्रस्ताव सभेच्या मंजुरीसाठी येत असल्याने इतके दिवस प्रलंबित राहिलेल्या निवडीचा निर्णय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पक्षपातळीवरील चर्चा पूर्ण

स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीचा प्रस्ताव महापालिका सभेपुढे मान्यतेसाठी असून, त्यावर नियमानुसार निर्णय घेतला जाईल, असे भाजपचे सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी सांगितले. यासंदर्भात पक्षपातळीवर चर्चा होऊन निर्णय निश्चित झाला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

“महापालिका सभेत स्वीकृत नगरसेवक नियुक्तीबाबत प्रस्ताव मान्यतेसाठी आहे. त्यासोबत नियमानुसार योग्य निर्णय घेण्यात येणार आहे. पक्ष स्तरावर चर्चा करून निर्णय निश्चित झालेला आहे.”

– प्रशांत शितोळे, सत्तारुढ पक्षनेते. भाजपा.

“स्वीकृत नगरसेवक पदांसाठी भाजपकडून नावे ठरवताना इच्छुकांचे संघटनात्मक काम, सामाजिक क्षेत्रातील योगदान आणि शहराच्या प्रश्नांवरील त्यांचा अनुभव विचारात घेतला जाईल. पक्षपातळीवरील निर्णयानुसार ही नावे महापालिकेकडे सादर केली जातील.”

– शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष, भाजपा.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group