‘फ्रेंड्स मोबाईल्स’ने पाळला ग्राहकांना दिलेला शब्द; लकी ड्रॉच्या विजेत्यांना बक्षिसांचे वितरण!
अजित नाथ, राहुल शेंडगे आणि किसान मंडल ठरले भाग्यवान विजेते; ओप्पो मोबाईलच्या प्री-बुकिंग योजनेतील विजेत्यालाही ई-बाईक प्रदान

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
मोबाईल खरेदीसोबत ग्राहकांना आकर्षक बक्षिसे देण्याचे आश्वासन प्रत्यक्षात उतरवत फ्रेंड्स मोबाईल्सने ग्राहकांचा विश्वास सार्थ ठरविला आहे. ग्राहकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या लकी ड्रॉचा निकाल जाहीर करून भाग्यवान विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, ‘केवळ आश्वासन नाही, तर दिलेला शब्द पूर्ण करण्याची बांधिलकी’ फ्रेंड्स मोबाईल्सने कृतीतून दाखवून दिली आहे.
फ्रेंड्स मोबाईल्सच्या वतीने ग्राहकांना मोबाईल खरेदीसोबत आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष लकी ड्रॉ योजना राबविण्यात आली होती. या योजनेला ग्राहकांचा प्रतिसाद मिळाला. लकी ड्रॉचा निकाल जाहीर झाल्यानंतर अजित नाथ, राहुल शेंडगे आणि किसान मंडल यांची भाग्यवान विजेते म्हणून निवड झाली. या विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आल्याची माहिती फ्रेंड्स मोबाईल्स व्यवस्थापनाने दिली.
ओप्पोच्या प्री-बुकिंग ग्राहकाला ई-बाईक देऊन पाळला शब्द!
विशेष म्हणजे, फ्रेंड्स मोबाईल्सने यापूर्वी ओप्पो कंपनीच्या नवीन F35 सिरीजच्या लाँचिंगनिमित्त विशेष प्री-बुकिंग ऑफर जाहीर केली होती. या ऑफरमध्ये सुरुवातीच्या प्री-बुकिंग ग्राहकांना लकी ड्रॉच्या माध्यमातून ई-बाईक जिंकण्याची संधी देण्यात आली होती.
या योजनेचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाग्यवान विजेत्याला प्रत्यक्ष ई-बाईक प्रदान करण्यात आली. त्यामुळे ग्राहकांना दिलेले आश्वासन पूर्ण करत फ्रेंड्स मोबाईल्सने आपल्या विश्वासार्हतेची प्रचिती दिली.
हेही वाचा – मुलांना मोबाइल-टीव्हीपासून दूर ठेवण्याचा आसिनचा खास नियम; पुस्तकांच्या संगतीत वाढतेय ९ वर्षांची मुलगी!

दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांच्या आनंदात भर!
ग्राहकांच्या खरेदीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी फ्रेंड्स मोबाईल्सने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विविध आकर्षक योजना राबविल्या. ग्राहकांना मोठी बक्षिसे जिंकण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘मेगा लकी ड्रॉ’चे आयोजन करण्यात आले.
या योजनेच्या माध्यमातून टाटा टियागो कार, रॉयल एनफिल्ड हंटर ३५०, इलेक्ट्रिक स्कूटर, स्मार्ट टीव्ही, रेफ्रिजरेटर, गिअर सायकल, एअर फ्रायर, मिक्सर ग्राइंडर आणि डिनर सेट यांसारखी आकर्षक बक्षिसे जाहीर करण्यात आली होती.
ग्राहकांना केवळ आकर्षक ऑफर देण्यापुरते मर्यादित न राहता, विजेत्यांना प्रत्यक्ष बक्षिसे प्रदान करण्याच्या उपक्रमामुळे फ्रेंड्स मोबाईल्सने ग्राहकाभिमुख व्यवसायाचा आदर्श निर्माण केला आहे.
ग्राहकांचा विश्वास हीच फ्रेंड्स मोबाईल्सची खरी ओळख!
मोबाईल विक्री क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेत ग्राहकांना दर्जेदार सेवा, आधुनिक तंत्रज्ञान आणि आकर्षक योजनांचा लाभ देण्यावर फ्रेंड्स मोबाईल्सचा भर राहिला आहे. ग्राहकांनी दाखविलेला विश्वास जपणे आणि त्यांच्या अपेक्षांची पूर्तता करणे, हीच व्यवसायाच्या यशाची गुरुकिल्ली असल्याची भावना व्यवस्थापनाने व्यक्त केली.
लकी ड्रॉमधील विजेत्यांना बक्षिसे प्रदान करून फ्रेंड्स मोबाईल्सने ग्राहकांशी असलेले विश्वासाचे नाते अधिक दृढ केले आहे. या उपक्रमाचे ग्राहकांकडून कौतुक होत असल्याचे व्यवस्थापनाने सांगितले.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“फ्रेंड्स मोबाईल्ससाठी प्रत्येक ग्राहक महत्त्वाचा आहे. ग्राहकांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास हीच आमची खरी संपत्ती आहे. आम्ही केवळ आकर्षक ऑफर जाहीर करत नाही, तर त्या प्रत्यक्षात पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत. ओप्पोच्या प्री-बुकिंग योजनेतील विजेत्याला ई-बाईक प्रदान केली. तसेच लकी ड्रॉमधील भाग्यवान विजेत्यांना बक्षिसांचे वितरण केले. ग्राहकांच्या चेहऱ्यावरील आनंद हेच आमच्या यशाचे खरे समाधान आहे.”
– कैलास राठोड, फ्रेंड्स मोबाईल्स.




