Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

पंजाबमध्ये कर्मभूमी एक्सप्रेसच्या चार डब्यांना आग; प्रवाशांमध्ये घबराट

सराई बंजारा परिसरातील घटना; प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढल्याचा प्राथमिक दावा, मदत आणि बचावकार्य सुरू

पंजाब : पंजाबमधील पटियाला आणि राजपुरा दरम्यान ६ नोव्हेंबर २०२६ रोजी कर्मभूमी एक्सप्रेसला आग लागल्याची घटना घडली. सराई बंजारा परिसरात धावत्या ट्रेनच्या चार डब्यांना आग लागल्याचे वृत्त आहे. अचानक लागलेल्या आगीमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. ट्रेनमधून धुराचे लोट बाहेर पडू लागल्यानंतर प्रवाशांनी डब्यांमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कर्मभूमी एक्सप्रेस पंजाबहून बिहारच्या दिशेने जात होती. राजपुरा जंक्शनच्या आधी सराई बंजारा परिसरात ही घटना घडली. सुरुवातीला ट्रेनच्या इंजिनपासून पाचव्या डब्यापर्यंत धूर दिसून आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर रेल्वे प्रशासनाला घटनेची माहिती देण्यात आली आणि संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सतर्क करण्यात आले.

काही वृत्तांनुसार, आगीची सुरुवात पँट्री कारमधून झाल्याची शक्यता आहे. त्यानंतर आग वेगाने पसरून चार डब्यांपर्यंत पोहोचल्याचे सांगितले जात आहे. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा –  मनोज जरांगे पाटलांचा ऑडिओ क्लिपप्रकरणी मोठा खुलासा; मूळ डिव्हाइस रामदास कदम यांच्याकडे असल्याचा दावा

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेगाड्यांमध्ये मोठी गर्दी असताना ही घटना घडल्याने प्रवाशांमध्ये चिंता वाढली. काही प्रवासी सामानासह डब्यांमधून बाहेर पडताना दिसल्याची माहिती आहे. सोशल मीडियावरही या घटनेचे काही व्हिडिओ प्रसारित होत आहेत.

मदत आणि बचावकार्य सुरू

घटनेची माहिती मिळताच मदत आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती आहे. प्राथमिक वृत्तानुसार, प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याने मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे. मात्र, जखमींची संख्या, संभाव्य जीवितहानी आणि मालमत्तेच्या नुकसानीबाबत रेल्वे प्रशासनाकडून अधिकृत माहिती मिळणे बाकी आहे.

आगीचे नेमके कारण आणि घटनेचा सविस्तर तपशील रेल्वे प्रशासनाच्या अधिकृत माहितीनंतरच स्पष्ट होणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group