Breaking-newsमहाराष्ट्र

अकोल्यात जुगार खेळणाऱ्या ३ नगरसेवकांसह २८ जणांना अटक

अकोला जिल्ह्यातील अकोट येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली. याप्रकरणी पोलिसांनी २८ जणांना अटक केली असून यामध्ये ३ विद्यमान नगरसेवक, माजी नगराध्यक्ष आणि एका नगरसेविकेच्या मुलाचा समावेश आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये अकोला, अमरावती आणि बुलडाणा जिल्ह्यातील व्यापारीही आहेत.

परीक्षाविधीन पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांनी ही कारवाई केली. अकोट येथील माऊली मनोरंजन केंद्रावर जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरुन पोलिसांनी या केंद्रावर धाड टाकली. पोलिसांनी रोख रकमेसह मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच २८ जणांना अटकही केली आहे. विशेष म्हणजे यात ३ नगरसेवकांचा समावेश आहे. त्यामुळे अकोला जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. अकोला जिल्ह्यात गेल्या ६ दिवसातील ही चौथी कारवाई ठरली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button