Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मीनाक्षी शिंदेंचा शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा; प्रताप सरनाईकांच्या सल्ल्यानंतर २४ तासांत निर्णय

मुंबई | ठाण्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कार्यकर्ते प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात गंभीर आरोपांना सामोरे जावे लागलेल्या शिवसेना (शिंदे गट) महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख तथा माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी गुरुवारी दुपारी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिंदे यांनी पदावरून बाजूला व्हावे अशी जाहीर भूमिका मांडली होती. या विधानाला २४ तास उलटण्यापूर्वीच मीनाक्षी शिंदे यांनी पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला.

पूर्णेकर हत्या प्रकरणानंतर विरोधकांकडून सत्ताधारी पक्षाला लक्ष्य केले जात होते. या पार्श्वभूमीवर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट मत मांडले होते. “माझ्यावर असे गंभीर आरोप झाले असते, तर आरोप सिद्ध होईपर्यंत पद सोडतो अशीच माझी भूमिका राहिली असती. मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही सांगितले आहे की, जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत मीनाक्षी शिंदे यांनी पक्षाचे पद बाजूला ठेवावे, हेच योग्य ठरेल,” असे सरनाईक म्हणाले होते.

हेही वाचा

टाटा समूहावरून राहुल गांधी-निर्मला सीतारमण यांच्यात जुंपली; अमित शाहांच्या घरी बैठक का झाली? राहुल गांधींचा थेट सवाल

अखेर प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर महिन्याभराने मीनाक्षी शिंदे यांनी महिला आघाडी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी एकनाथ शिंदे यांना पत्र लिहीत राजीनामा दिला आहे. त्यामध्ये समाजमाध्यमावर तसेच पक्षपातळीवर माझ्याबाबत सुरु असलेले आरोप प्रत्यारोप व सर्वपक्षीय एकत्र येऊन माझ्यावर विविध आरोप करत पक्ष नेतृत्त्वास अर्थात मुख्य नेते व पालकमंत्री म्हणून आपणास वेठीस धरण्याचे षड्यंत्र सुरु आहे. हे पाहून माझ्या मनाला प्रचंड वेदना झाल्या.

मी आजवर संपूर्ण निष्ठेने काम केले. पक्षाला किंवा आपणास कधीही मान खाली घालावी लागेल असे कोणतेही कृत्य केले नाही. तरीही ज्या प्रकरणांशी माझा काहीही संबंध नाही त्यामध्ये माझे नाव जोडून आपल्यावर आणि पक्षावर दबाव निर्माण केला जात आहे, हे पाहून मन व्यथित होते. ज्या नेतृत्वाचा सन्मान जपण्यासाठी मी आजवर काम केले. त्याच नेतृत्त्वाच्या बदनामीचे कारण माझ्यामुळे व्हावे ही कल्पानाही मला सहन होत नाही. माझी निष्ठा आणि माझ्या कार्याची पावती आरोपांच्या माध्यमातून दिली जात असल्याची भावना मनाला बोचत आहे. म्हणूनच, मी महिला आघाडी प्रमुख पदाचा राजीनामा देत आहे. पक्षाची प्रतिष्ठा आणल्या नेतृत्त्वाचा सन्मान जपण्यासाठी घेतला असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button