Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीपिंपरी / चिंचवड

जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत राजमाता जिजाऊ कॉलेजचे यश

पिंपरी- चिंचवड :  श्री संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, इंद्रायणी नगर येथे झालेल्या शालेय जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स (मैदानी) स्पर्धेत राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय लांडेवाडी भोसरी येथील विद्यार्थी खेळाडूंनी ॲथलेटिक्स स्पर्धेतील विविध क्रीडा प्रकारात यश संपादन केलेले आहे. त्यातील प्रथम  क्रमांक प्राप्त 07 खेळाडूंची दि. 30 व 31 ऑक्टोबर 2026 या कालावधीत संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणी नगर, भोसरी पुणे येथे होणाऱ्या शालेय विभागस्तरीय ॲथलेटिक्स क्रीडा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

मैदानी क्रीडा स्पर्धेतील निकाल -4×100 मीटर रिले – 19 वर्षाखालील मुलांच्या संघाचा प्रथम क्रमांक 1) ओंकार ढवळे 2) आयुष्य गुप्ता 3) ओंकार गुरूनावर 4) आरुष कुमार 5) दर्शित पाटील
5000 मीटर चालणे – सार्थक गोंडे – प्रथम क्रमांक,
400 मीटर हर्डल्स -गौरव रोडे -प्रथम क्रमांक,
लांब उडी- सार्थक गोंडे- प्रथम क्रमांक

हेही वाचा –  विशेष लेख : मनुस्मृतीचा इतिहास, स्त्रिया-शूद्रांचे स्थान आणि शिक्षण अधिकार..!

सदर खेळाडूंना कनिष्ठ महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालक प्रा.गोपीचंद करंडे यांनी विशेष मार्गदर्शन केले.

या खेळाडूंच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व भोसरी चे प्रथम आमदार मा.श्री. विलासराव लांडे साहेब यांनी विशेष अभिनंदन करून खेळाडूंना विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे खजिनदार व पिं.चि. मनपा. स्थायी समितीचे मा.अध्यक्ष श्री अजितभाऊ गव्हाणे, संस्थेचे सचिव श्री सुधीर मुंगसे सर, पिं.चिं. मनपाचे नगरसेवक व संस्थेचे विश्वस्त विक्रांतदादा लांडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कानडे के.जी , उपप्राचार्य प्रा.किरण चौधरी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ.नेहा बोरसे, रजिस्ट्रार सौ.अश्विनी चव्हाण, विभाग प्रमुख प्रा. राजू हजारे, प्रा.योगिता बारवकर, प्रा. संगिता गवस व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group