दुष्काळग्रस्त भागातील २ लाख ४० हजार विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी; ‘झिरो चलन’द्वारे भरले अर्ज
विद्यार्थ्यांना आर्थिक दिलासा; यापूर्वी शुल्क भरलेल्यांना परतावा देण्याची प्रक्रिया सुरू, चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

मुंबई : दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने परीक्षा शुल्कमाफीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा आतापर्यंत २ लाख ४० हजार ३६५ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला असून, त्यांनी ‘झिरो चलन’ सुविधेद्वारे एकही रुपया परीक्षा शुल्क न भरता अर्ज दाखल केले आहेत, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.
‘झिरो चलन’ सुविधेमुळे शुल्क न भरता अर्ज
दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींमुळे शिक्षणात अडथळे येऊ नयेत, या उद्देशाने पात्र विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारले जाऊ नये, असा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संचालनालय, विद्यापीठे आणि परीक्षा विभागांच्या स्तरावर आवश्यक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रक्रियेचा नियमित आढावा घेतला जात असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.
परीक्षेचा अर्ज भरताना विद्यार्थ्यांना शुल्क भरण्याची आवश्यकता पडू नये, यासाठी अर्ज प्रक्रियेत ‘झिरो चलन’ हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांना कोणतेही परीक्षा शुल्क न भरता अर्ज दाखल करणे शक्य झाले आहे. सर्व विद्यापीठांनी परीक्षा शुल्कमाफीच्या अंमलबजावणीसंदर्भात परिपत्रकेही जारी केली आहेत.
हेही वाचा – महाराष्ट्राच्या ‘डॅशबोर्ड प्रणाली’चे कर्नाटकातही अनुकरण करा; उपसभापती सचिन अहिर यांची संकल्पना
यापूर्वी शुल्क भरलेल्यांना परतावा
ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी परीक्षा शुल्क भरले आहे, त्यांना ते परत करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. दुष्काळग्रस्त भागातील कोणताही पात्र विद्यार्थी या सवलतीपासून वंचित राहू नये आणि अर्ज भरताना अडचण येऊ नये, यासाठी सर्व विद्यापीठांना आवश्यक सूचना देण्यात आल्याचे चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले.
परीक्षा शुल्कमाफीसंदर्भात शैक्षणिक अडचण असल्यास विद्यार्थ्यांनी संबंधित विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळ, जनसंपर्क अधिकारी किंवा विद्यार्थी विकास विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण विभागाने केले आहे.
विद्यापीठनिहाय संपर्क अधिकारी
१. मुंबई विद्यापीठ, मुंबई
परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक : डॉ. पूजा रौंदळे — ९३२२०२०५८९
जनसंपर्क अधिकारी : लीलाधर बनसोड — ९८३३९६९९७७
२. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक : डॉ. राजेंद्र तलवारे — ९८९०६४२४३१
विद्यार्थी विकास संचालक : डॉ. सविता कुलकर्णी — ७७२००३६७७४
अजय ठुबे — ७५८८१६९१३४
३. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक : डॉ. अजितसिंग एन. जाधव — ९५४५५९५९९९
विद्यार्थी विकास संचालक : अलोक जत्राटकर — ८६९८९२८०८०
४. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक : डॉ. अंधारे — ९९७५०५५१५५
विद्यार्थी विकास संचालक : डॉ. काळवणे — ७०२०६३४५०२




