पिंपरी / चिंचवडताज्या घडामोडीपाटी-पुस्तक

पिंपरी चिंचवड शहर व मावळ परीसरात जनसमुदायात सायबर सुरक्षिततेचा जागर

सायबर योध्दाचा पंधरा दिवसांचा जनजागृती अभियान उपक्रम संपन्न

सायबर शिका, सायबर सुरक्षित राहा! सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना सायबर सुरक्षेचा संदेश

चिंचवड | वाढत्या डिजिटल युगात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना नागरिकांमध्ये सायबर सुरक्षिततेविषयी जागरूकता निर्माण करणे काळाची गरज बनली आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज, चिंचवड आणि क्विक हील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’या राष्ट्रीय उपक्रमांतर्गत कमला एज्यूकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, खजीनदार डॉ. भूपाली शहा, संचालिका डॉ. तेजल शहा, समन्वयीका डॉ. हर्षिता वाच्छानी, क्वीक हिल फाऊंडेशनच्या अध्यक्षा अनुपमा काटकर, संचालक अजय शिर्के, दिपू सिंग, गायत्री केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील सायबर योध्दा विद्यार्थ्यानी पंधरा दिवसांचा जनजागृती अभियान विविध ठिकाणी राबविला.

पिंपरी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्राचार्य ए.के. जाधव, दामोदर चापेकर, काळभोर नगर, रूपी नगर येथील तृतीय पंथीय समुदाय, भाजी विक्रेते, नागरीक, विद्यार्थी, औद्योगिक क्षेत्रातील लधू उद्योग संस्थेतील कामगार या जनसमुदायाना मार्गदर्शन, प्रशिक्षण देवून जनजागृती केली.

मावळ परिसरातील सातेगाव गावाच्या सरपंच ज्योती आगालमे, उपसरपंच वैशाली आनंद याच्या मार्गदर्शनाखाली गावातील धरोधरी जनसमुदायामध्ये प्रतिभा महाविद्यालयाच्या सायबर सेलच्या अध्यक्षा स्नेहा तेली, पदाधिकारी सिमरन यादव, पियुषा रोहम, साकिब चौधरी, प्रज्ञा गावडे, फैसल खान सायबर योध्दानी भव्य सायबर जनजागृती मोहीम राबविली. धरोधरी सर्वे करून मोबाईल तपासणी केली व सायबर मुक्त प्रमाण पत्राचे वाटप समन्वयीका डॉ. हर्षिता वाच्छानी, सरपंच ज्योती आगालमे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट नागरिकांना ऑनलाइन फसवणूक, आर्थिक लूट, समाज माध्यमांचा गैरवापर आणि वैयक्तिक माहितीच्या चोरीसारख्या धोक्यांपासून सावध करणे हा होता. महाविद्यालयातील प्रशिक्षित ‘सायबर योध्दा’ विद्यार्थ्यांनी सार्वजनिक ठिकाणे, बाजारपेठा, बस स्थानके आणि गर्दीच्या ठिकाणी जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधला.

हेही वाचा

प्रियदर्शनी स्कूल, मोशी येथे ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत प्रशिक्षण सत्राचे आयोजन

यावेळी सायबर योध्दानी तेथील नागरीक, महिला, विद्यार्थी, जेष्ठ नागरीक आदीना अनोळखी लिंक आणि मेसेजपासून सावध राहा – कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका.

ओटीपी आणि बँक माहिती गोपनीय ठेवा बँक कधीही फोनवर ओटीपी, पासवर्ड मागत नाही, ही माहिती कोणालाही देऊ नका.
मजबूत पासवर्डचा वापर साधा पासवर्ड टाळून अक्षरे, आकडे आणि चिन्हांचा वापर करून मजबूत पासवर्ड तयार करा.

सोशल मीडियावर प्रायव्हसी बाबत आपली वैयक्तिक माहिती, लोकेशन आणि फोटो अनोळखी व्यक्तींसोबत शेअर करूनका. त्वरित तक्रार सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईनवर किंवा http://www.cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा

प्रतिभा महाविद्यालयातील सायबर योध्दा विद्यार्थी केवळ वर्गातील शिक्षणापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत डिजिटल साक्षरतेचा संदेश घरोघरी पोहोचविण्याचा प्रयत्न केला, याचे नागरिकांनी देखील कौतुक केले. या बाबतीत संस्थाचालक डॉ. दीपक शहा, प्राचार्या डॉ क्षितीजा गांधी, उपप्राचार्या डॉ जयश्री मुळे, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरीया आदीनी या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व, संवाद कौशल्य आणि सामाजिक जबाबदारीची भावना अधिक दृढ झाली. ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या उपक्रमाच्या माध्यमातून सुरक्षित, सतर्क आणि सक्षम डिजिटल समाज निर्मितीचा संकल्प प्रतिभा कॉलेज आणि क्विक हील फाउंडेशनने केला असून, सायबर सुरक्षितता ही केवळ गरज नसून प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, हा मोलाचा संदेश व पंधरा दिवसाच्या जनजागृती अभियान या मोहिमेतून देण्यात आला. या बद्धल सायबर योध्दातील सहभागी विद्यार्थ्याचे डॉ. दीपक शहा व आदीनी कौतूक केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button