नूतन अभियांत्रिकीमध्ये “सायबर सिक्युरिटी आणि ब्लॉकचेन फॉर सिक्युअर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन” या विषयावरील कार्यशाळा संपन्न

पिंपरी-चिंचवड : नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, तळेगाव दाभाडे येथील माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे रिसेंट ऍडव्हान्स इन सायबर सिक्युरिटी अँड ब्लॉक चेन फॉर सिक्युअर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन या विषयावर फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यशाळा नुकतीच यशस्वीरित्या पार पडली . ही पाच दिवशीय ऑनलाईन व ऑफलाईन अशा संमिश्र पद्धतीने घेतली गेली. यामध्ये शैक्षणिक संस्था, संशोधन संस्था आणि उद्योग क्षेत्रातील ५०० हून अधिक सहभागींची नोंदणी झाली.
कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी इंडिया ब्लॉकचेन फोरमचे अध्यक्ष प्रसन्न लोहार हे तज्ज्ञ वक्ते म्हणून उपस्थित होते. नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, माजी राज्यमंत्री संजय भेगडे, उपाध्यक्ष नंदकुमार शेलार, विश्वस्त रामदास काकडे, चंद्रकांत शेटे, अभियांत्रिकीचे संचालक डॉ. प्रमोद पाटील, माहिती आणि तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ, सौरभ सावजी आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. प्रमोद पाटील यांनी प्रास्ताविक करून आपल्या भाषणातून उदयोन्मुख तंत्रज्ञान, सातत्यपूर्ण अध्ययन, संशोधन आणि नवोपक्रम यांचे महत्त्व अधोरेखित केले.
संजय ( बाळा ) भेगडे यांनी बदलत्या डिजिटल तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक आणि विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानांसाठी सक्षम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा – शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत? मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
या कार्यशाळेमध्ये मोनोरेखा टेक इनोव्हेशन्स प्रा.लि आणि ब्लॉकचेन टेक्नोलोंजी लीड चे सह-संस्थापक व सीईओ, पीसीसीओई च्या संगणक विभागप्रमुख डॉ. सोनाली पाटील, डॉ. प्राध्न्या कांडगे, तसेच समीर बहाळकर यांसारख्या नामवंत शिक्षणतज्ज्ञ आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांची मार्गदर्शनपर सत्रे घेण्यात अली
या तज्ज्ञांच्या सत्रांमध्ये ब्लॉकचेन डेव्हलपमेंट आणि स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स, ब्लॉकचेन व सायबर सिक्युरिटी, आयओटी व क्लाउडमधील ब्लॉकचेनचे अनुप्रयोग, बँकिंग, हेल्थकेअर व शिक्षण क्षेत्रातील ब्लॉकचेनचा वापर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर अॅनालिटिक्स, प्रायव्हसी आणि भविष्यातील तंत्रज्ञान या विषयांचा समावेश होता
या कार्यशाळेच्या माध्यमातून सहभागी शिक्षकांना सायबर सिक्युरिटी, ब्लॉकचेन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, वेब 3, सुरक्षित डिजिटल परिवर्तन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानातील नवीनतम घडामोडींची माहिती मिळणार आहे. तसेच संशोधन, नवोपक्रम, ज्ञानाची देवाणघेवाण आणि उद्योग–शैक्षणिक संस्था सहकार्याला चालना देणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देशहोता.
कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. अजय सोनावणे आणि प्रा. भारती धोटे यांनी यांनी काम पहिले. डॉ. सौरभ सावजी यांनी आभार व्यक्त केले.




