शालेय राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी राजमाता जिजाऊ कनिष्ठ महाविद्यालयातील तीन खेळाडूंची निवड

भोसरी, पुणे | प्रवरा कन्या विद्या मंदिर, प्रवरानगर (ता. राहाता, जि. अहिल्यानगर) येथे पार पडलेल्या शालेय विभागस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत राजमाता जिजाऊ कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. महाविद्यालयातील तीन खेळाडूंनी आपापल्या वजन गटात प्रथम क्रमांक पटकावून परभणी येथील जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित केल्या जाणाऱ्या शालेय राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे.
प्रथम क्रमांक विजेते व राज्यस्तरासाठी निवड झालेले खेळाडू:
कु. रुद्र खामकर (४८ किलो गट) – प्रथम क्रमांक
कु. प्रज्वल सीतापुरे (६३ किलो गट) – प्रथम क्रमांक
कु. निश्चय जीनवाल (८१ किलो गट) – प्रथम क्रमांक
हेही वाचा
उद्योजक प्रसाद कुलकर्णी यांच्या उद्योजकीय वाटचालीची राष्ट्रीय स्तरावर दखल!
पाच खेळाडूंनी पटकावला द्वितीय क्रमांक:
याशिवाय महाविद्यालयातील आणखी पाच खेळाडूंनी कसून झुंज देत विभागस्तरावर द्वितीय क्रमांक संपादन केला:
कु. साईराज हळीकर (५२ किलो गट)
कु. मल्हार कपिले (५४ किलो गट)
कु. पार्थ तांबेरे (७५ किलो गट)
कु. प्राची वाघमोडे (४८ किलो गट)
कु. चैत्राली लांडगे (७५ किलो गट)
या सर्व खेळाडूंना कनिष्ठ महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. गोपीचंद करंडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
खेळाडूंच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष तथा भोसरीचे प्रथम आमदार विलासराव लांडे यांनी खेळाडूंचे विशेष अभिनंदन करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच संस्थेचे खजिनदार व पिं.चिं. मनपा स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे, सचिव सुधीर मुंगसे, पिं.चिं. मनपाचे माजी नगरसेवक व संस्थेचे विश्वस्त विक्रांत लांडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. जी. कानडे, उपप्राचार्य प्रा. किरण चौधरी, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. नेहा बोरसे, रजिस्ट्रार अश्विनी चव्हाण, विभाग प्रमुख प्रा. राजू हजारे, प्रा. योगिता बारवकर, प्रा. संगिता गवस यांच्यासह प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खेळाडूंचे कौतुक केले.




