Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनात ओमराजे निंबाळकरांना ‘गो बॅक’च्या घोषणा; मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन

अहिल्या अभ्यासिका येथे आंदोलकांशी संवाद; ‘तुमची परीक्षा आयुष्यभराची, आमची निवडणूक पाच वर्षांची’ म्हणत विद्यार्थ्यांना पाठिंबा

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विविध मागण्यांसाठी पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला शिवसेना (शिंदे गट) खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अहिल्या अभ्यासिका येथे भेट दिली. मात्र, निंबाळकर भाषणासाठी उभे राहताच काही आंदोलक विद्यार्थ्यांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत ‘गो बॅक’च्या घोषणा दिल्या. या घटनेनंतर निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले.

विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत भूमिका स्पष्ट करताना निंबाळकर म्हणाले, “तुमची परीक्षा आयुष्यभराची आहे, तर आमची निवडणूक पाच वर्षांची आहे. तुमच्या यातना आमच्यापेक्षा खूप जास्त आहेत आणि मला तुमच्या मागण्या मान्य आहेत.” विद्यार्थ्यांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

निंबाळकर यांनी MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीसंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांचा विषय मांडणार असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या मागण्यांवर शासनाकडून कार्यवाही व्हावी, यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

हेही वाचा –  भगवान महावीरांचा क्षमा, अहिंसा आणि मैत्रीचा संदेश संपूर्ण मानवतेचा उत्सव बनावा : राज्यपाल जिष्णु देव वर्मा

दरम्यान, निंबाळकर आंदोलनस्थळी आल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यांच्या भाषणादरम्यानही ‘गो बॅक’च्या घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे त्यांना आपले भाषण आटोपते घ्यावे लागले.

पुण्यात सध्या MPSC विद्यार्थ्यांची आंदोलने विविध ठिकाणी सुरू असून, वेगवेगळ्या गटांकडून परीक्षा पद्धती, आयोगाच्या कारभारासह विविध मागण्या मांडल्या जात आहेत. काही विद्यार्थ्यांकडून MPSC अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात येत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button