माईर्स एमआयटी आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाचा ‘एज्युस्किल्स कनेक्ट समिट २०२६’ मध्ये गौरव
७ संस्थात्मक व ३ वैयक्तिक पुरस्कारांनी सन्मान

आळंदी (पुणे) | माईर्स एमआयटी आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय, आळंदी (दे.), पुणे यांनी जयपूर(राजस्थान) येथे २५ व २६ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या एज्युस्किल्स कनेक्ट समिट २०२६ मध्ये संस्थात्मक स्तरावरील ७ पुरस्कार आणि ३ वैयक्तिक पुरस्कार पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
संचालकांना ‘डायरेक्टर एक्सलन्स अवॉर्ड’महाविद्यालयाचे संचालक डॉ. बी. बी. वाफारे यांना त्यांच्या कुशल नेतृत्वासाठी व शैक्षणिक योगदानासाठी डायरेक्टर एक्सलन्स अवॉर्ड २०२६’ देऊन सन्मानित करण्यात आले. उपसंचालिकांना ‘वुमेन लीडरशिप अवॉर्ड’उपसंचालक (शैक्षणिक व संशोधन) डॉ. अक्षदा कुलकर्णी यांना ‘वुमेन लीडरशिप अवॉर्ड २०२६’ तसेच ‘बेस्ट परफॉर्मिंग सीओई (COE) कोऑर्डिनेटर २०२६’ हे दोन पुरस्कार प्रदान करण्यात आले.
संस्थात्मक स्तरावरील पुरस्कार
1. बेस्ट परफॉर्मिंग इन्स्टिट्यूट – २०२६
2. बेस्ट परफॉर्मिंग कॉलेज २०२६ – एज्युस्किल्स
3. फ्यूचर-रेडी इन्स्टिट्यूशन अवॉर्ड
4. रीजनल लँग्वेज एक्सलन्स अवॉर्ड – मराठी
5. आउटस्टँडिंग कॉन्ट्रिब्युशन इन मिलियन व्हर्च्युअल इंटर्नशिप
6. AIR-2: कॉलेज इन AICTE-एज्युस्किल्स व्हर्च्युअल इंटर्नशिप अवॉर्ड
7. असेस2मी (Assess2me) मोस्ट एंगेज्ड इन्स्टिट्यूट अवॉर्ड्स २०२६
हेही वाचा
एसआयआर : हरकतींसाठी १२ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ; बीएलओ घरी येऊन कागदपत्रे स्वीकारणार
विद्यार्थी व विभागीय समन्वयकांचे कौतुक
या यशामागे गेल्या दोन वर्षांत एज्युस्किल्सच्या माध्यमातून इंटर्नशिप यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे परिश्रम हा सर्वात महत्त्वाचा घटक असल्याचे संस्थेने नमूद केले. तसेच सर्व विभागांचे एज्युस्किल्स समन्वयक, सर्व अधिष्ठाता (Deans) व विभागप्रमुख यांनी घेतलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचेही विशेष कौतुक करण्यात आले.
हे यश मा. डॉ. सुनील कराड सर यांच्या द्रष्टे नेतृत्वाचे, संचालक डॉ. बी. बी. वाफारे यांच्या मार्गदर्शनाचे व पाठबळाचे तसेच सर्व घटकांच्या सांघिक प्रयत्नांचे फलित असल्याची भावना संस्थेने व्यक्त केली. सर्व पुरस्कारप्राप्त मान्यवर, विद्यार्थी व समन्वयकांचे महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.





