निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पिंपरीत निदर्शने
संभाजी ब्रिगेड व सिपीएमच्या वतीने आंदोलन

पिंपरी | भारताच्या निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे संभाजी ब्रिगेड व सिपीएम यांच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली.
यावेळी आंदोलकांनी ‘ज्ञानेश कुमार यांना अटक करा’, ‘नरेंद्र मोदी राजीनामा द्या’, ‘अमित शहा राजीनामा द्या’, ‘आरएसएस-भाजपा सरकार चले जाओ’ अशा घोषणा देत निषेध व्यक्त केला.
या आंदोलनात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर सिपीएमचे सचिन देसाई, लोकसागर संघटनेचे डॉ. सुरेश बेरी बामसेफचे लहू अनारसे अखिल भारतीय हिंदू महासभेचे शहराध्यक्ष राहुल मदने यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण जिल्हा उपाध्यक्ष भैय्यासाहेब गजधने शहर उपाध्यक्ष गणेश देवराम सचिव मंगेश चव्हाण संघटक प्रकाश घोडके सामाजिक कार्यकर्ते विशाल सरवदे भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीचे कॉम्रेड सचिन अनिसचे सुधीर मुरुडकर, श्रीराम नलावडे,सुरेश बावनकर,नवजवान भारत सभेच्या स्वप्नजा व ललिता तसेच जनवादी महिला संघटनेच्या जयश्री साळोखे आणि रिया सागवेकर दिलीप कैतके,साहेबराव साळुंखे, सोनिया दिपके यांनी आंदोलनात सहभाग घेतला.
हेही वाचा
२०३७ पर्यंत एसटीची ‘ई-लालपरी’; १०० टक्के इलेक्ट्रिक ताफ्याचे लक्ष्य; मंत्री प्रताप सरनाईक
निवडणूक आयोगाच्या कामकाजाबाबत सार्वजनिक पातळीवर उपस्थित झालेल्या प्रश्नांची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची पदावरून हकालपट्टी करून त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई व गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
निवडणूक प्रक्रिया ही लोकशाहीचा अत्यंत महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. निवडणूक आयोगाच्या कामकाजाबाबत नागरिकांच्या मनात कोणतीही शंका निर्माण होऊ नये, यासाठी पारदर्शकता आणि निष्पक्षतेबाबत ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी विविध वक्त्यांनी केली.
या आंदोलनाचे आयोजन संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे आणि सिपीएमचे सचिन देसाई यांनी केले होते.





