ताज्या घडामोडीपुणे

व्ही. के. माटे हायस्कूलमध्ये गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा; विविध उपक्रम व स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद

पुणे/प्रतिनिधी: व्ही. के. माटे हायस्कूलमध्ये यावर्षीचा गणेशोत्सव अत्यंत उत्साहपूर्ण आणि चैतन्यमय वातावरणात पार पडला. गणेशोत्सवाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देणे, कल्पकता वाढीस लावणे आणि संघभावना विकसित करणे या उद्देशाने विविध शैक्षणिक, कलात्मक व सर्जनशील उपक्रमांचे तसेच स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
​मोरया शिक्षण संस्थेच्या कार्यवाहक हयात विश्वस्त प्राचार्य माननीय सौ. इंद्रायणी माटे-पिसोळकर यांच्या संकल्पनेतून या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

​धडाकेबाज आगमन आणि भावपूर्ण विसर्जन

​उत्सवाच्या पहिल्या दिवशी लेझीम आणि ढोल-ताशांच्या गजरात, वाजत-गाजत शाळेच्या श्रींची मंगलमय वातावरणात प्रतिष्ठापना करण्यात आली. सलग पाच दिवस शाळेच्या प्रांगणात विविध स्पर्धांचा उत्साह पाहायला मिळाला. पाचव्या दिवशी ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात शाळेच्या प्रांगणातील पाण्याच्या हौदात बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला.
​विविध उपक्रम व उपक्रमांचे स्वरूप

उत्सवादरम्यान पर्यावरणपूरक गणपती बनवणे कार्यशाळा, हार बनवणे, मेहंदी, सॅलेड डेकोरेशन, कुकिंग विदाऊट गॅस, पोस्टर मेकिंग, फोटोग्राफी आणि आरती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

​गणपती कार्यशाळा: विद्यार्थ्यांनी शाडू माती व पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून आकर्षक गणेशमूर्ती साकारल्या.
​पोस्टर मेकिंग: पर्यावरण संवर्धन, सामाजिक जाणीव-जागृती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील विकासकामांतून ‘विकसित भारत’चे प्रभावी दर्शन विद्यार्थ्यांनी घडवले.

​इतर स्पर्धा: हार, मेहंदी, सॅलेड डेकोरेशन व कुकिंग स्पर्धेत विद्यार्थ्यांनी कौशल्याचे सुंदर प्रदर्शन केले, तर फोटोग्राफी स्पर्धेत गणेशोत्सवातील विविध सुंदर क्षण कॅमेऱ्यात टिपले.

हेही वाचा –  शालेय जिल्हास्तरीय रग्बी स्पर्धेत राजमाता जिजाऊ महाविद्यालयातील मुलांच्या संघाला विजेतेपद

​विविध स्पर्धांचा निकाल खालीलप्रमाणे:

​१. गणपती बनवणे कार्यशाळा

​इयत्ता ५ वी: प्रथम – रिया शहाडे | द्वितीय – प्रांजल आरेकर | तृतीय – विराज दर्शले
​इयत्ता ६ वी: प्रथम – अभय वाघमारे | द्वितीय – दूर्वा गाढवे | तृतीय – समृद्धी देंडगे
​इयत्ता ७ वी: प्रथम – विराज बेनरपे | द्वितीय – सार्थकी शेळके | तृतीय – आदिनाथ देऊळकर
​इयत्ता ८ वी: प्रथम – इंद्रायणी सुतार | द्वितीय – अथर्व पुजारी | तृतीय – ज्ञानेश्वरी गव्हाणे
​इयत्ता ९ वी: प्रथम – उत्कर्ष बोरगे, श्वेता दस, दिव्या भगत
​इयत्ता १० वी: प्रथम – स्वरा सुतार | द्वितीय – ओम कुंभार | तृतीय – ईशान सूर्यवंशी

​२. हार बनवणे स्पर्धा

​इयत्ता ५ वी: प्रथम – काव्य क्षीरसागर | द्वितीय – श्रेयश देवकर | तृतीय – पूर्वेस धर्मांकर
​इयत्ता ६ वी: प्रथम – श्रेया जाधव | द्वितीय – यशराज नवले | तृतीय – सारांश बांदल
​इयत्ता ७ वी: प्रथम – गार्गी पोपळगट | द्वितीय – राजनंदिनी कदम | तृतीय – संस्कृती कळसे व राजवीर पिंगळे
​इयत्ता ८ वी: प्रथम – बसवराज सलगरे | द्वितीय – ईश्वरी भोईर | तृतीय – अद्वैता जगताप
​इयत्ता ९ वी: प्रथम – श्रावणी क्षीरसागर | द्वितीय – आर्या आगासे | तृतीय – प्रणिता चोपडे
​इयत्ता १० वी: प्रथम – जानवी आष्टीकर | द्वितीय – धनश्री जोशी | तृतीय – सृष्टी सलगरे

​३. मेहंदी स्पर्धा

​इयत्ता ५ वी: प्रथम – नक्षत्रा लबडे | द्वितीय – रिया शहाडे | तृतीय – अनन्या बोराटे
​इयत्ता ६ वी: प्रथम – अनघा लोहार | द्वितीय – मनस्वी मोरे | तृतीय – ईश्वरी माने
​इयत्ता ७ वी: प्रथम – साक्षी डुकळे | द्वितीय – राजनंदिनी कदम | तृतीय – सेजल आरेकर
​इयत्ता ८ वी: प्रथम – सिया भालके | द्वितीय – तनिष्का शेंडे | तृतीय – स्नेहा पावणे
​इयत्ता ९ वी: प्रथम – श्रावणी क्षीरसागर | द्वितीय – संस्कृती कुलकर्णी | तृतीय – अपूर्वा हाऊसिंग
​मुले (मेहंदी): प्रथम – विनायक खोसे | द्वितीय – लहू मिरासे | तृतीय – साई जाधव
​इयत्ता १० वी: प्रथम – सृष्टी सलगरे | द्वितीय – गौरीचा गपाट | तृतीय – श्रावणी खंदारे व जानवी आष्टीकर

​४. पोस्टर मेकिंग स्पर्धा

​इयत्ता ५ वी: प्रथम – विश्वराज शेळके | द्वितीय – अनन्या बोराटे | तृतीय – दिव्या दळवी
​इयत्ता ६ वी: प्रथम – श्रेया दर्शने | द्वितीय – दूर्वा शिंदे | तृतीय – आराध्या कदम
​इयत्ता ७ वी: प्रथम – श्रेया खरात | द्वितीय – आरोही पाटील | तृतीय – आर्या चोलवार
​इयत्ता ८ वी: प्रथम – प्रणाली जाधव | द्वितीय – तेजस्विनी धुमाळ | तृतीय – स्मिता गाडे
​इयत्ता ९ वी: प्रथम – विनायक खोसे | द्वितीय – निर्भय तायडे | तृतीय – शार्दुल देशिंगे
​इयत्ता १० वी: प्रथम – तनय शहाडे
​इयत्ता ११ वी: प्रथम – वरदा टीकोळे

​५. कुकिंग विदाऊट गॅस स्पर्धा

​इयत्ता ५ वी: प्रथम – परिणीती शिंदे | द्वितीय – मनस्वी डुरे | तृतीय – स्वानंदी साळुंखे
​इयत्ता ६ वी: प्रथम – अर्णवी गरड | द्वितीय – देव रानडे | तृतीय – स्वराज येलगुंडे
​इयत्ता ७ वी: प्रथम – आस्था इथापे | द्वितीय – प्रेरणा जाधव व संस्कृती कळसे | तृतीय – स्वरा मगर
​इयत्ता ८ वी: प्रथम – आशिष थोरबोले | द्वितीय – प्रणाली जाधव | तृतीय – श्रुती कदम
​इयत्ता ९ वी: प्रथम – समृद्धी कोटकर | द्वितीय – रोशनी माने | तृतीय – युवराज भोईर
​इयत्ता १० वी: प्रथम – तनय शहाडे | द्वितीय – आदिती इंगळे | तृतीय – कौस्तुभ अत्तरदे

​६. आरती स्पर्धा (तुकडीनिहाय)

​इयत्ता ५ वी: प्रथम – ५ वी ‘ब’ | द्वितीय – ५ वी ‘अ’ | तृतीय – ६ वी ‘क’
​इयत्ता ६ वी: प्रथम – ६ वी ‘क’ व ‘ड’ | द्वितीय – ६ वी ‘अ’ | तृतीय – ६ वी ‘ड’
​इयत्ता ७ वी: प्रथम – ७ वी ‘क’ | द्वितीय – ७ वी ‘ड’ | तृतीय – ७ वी ‘क’
​इयत्ता ८ वी: प्रथम – ८ वी ‘ड’ | द्वितीय – ८ वी ‘अ’ | तृतीय – ८ वी ‘ब’
​इयत्ता ९ वी: प्रथम – ९ वी ‘अ’ | द्वितीय – ९ वी ‘ब’ | तृतीय – ९ वी ‘क’

​परीक्षकांचे योगदान

​या सर्व स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. तारकेश कोल्हटकर, सौ. रश्मी पिसोळकर, सौ. स्वाती काकडे, सौ. वर्षा कांबळे, कु. अनुष्का चिंचे, भार्गवी शिंदे, तेजल शिंदे, श्री. रणजीत सावंत सर, सौ. अपेक्षा गव्हाणे, समिता जैन, सौ. दगडे मॅडम आणि कु. श्रुती गोडबोले यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले व विजेत्यांचे परीक्षण केले.

​विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण शाळा परिसरात आनंदाचे व चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button