डॉ. डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसमध्ये ‘Envision 2026’ MCA इंडक्शन प्रोग्राम उत्साहात संपन्न

पिंपरी चिंचवड (विशेष प्रतिनिधी)
डॉ. डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस, वराळे येथील एम.सी.ए. (MCA) विभागात नव्याने प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘Envision 2026 – MCA Induction Program’ चे भव्य आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुशांत पाटील आणि सी.ई.ओ. (CEO) ॲड. अनुजा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. सुरेश शिरबहादूरकर यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) वेगाने बदलणाऱ्या युगासाठी स्वतःला सज्ज करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी डीन डॉ. योगेश गुरव यांनी करिअरमधील सातत्यपूर्ण शिक्षण आणि कौशल्यविकासाचे (Skill Development) महत्त्व अधोरेखित केले. MCA विभागप्रमुख प्रा. मनीष राऊत यांनी उपस्थितांचे स्वागत करून विभागातील शैक्षणिक उपक्रम व भविष्यातील व्यावसायिक संधींची सविस्तर माहिती दिली.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून ‘एरिक रोबोटिक्स, पुणे’ येथील एच.आर. हेड (HR Head) सुश्री गौरी ठोंबरे उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट जगतातील अपेक्षा, भरती प्रक्रिया आणि मुलाखतीची तयारी याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच, भविष्यात प्लेसमेंटच्या संधी उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक आश्वासन दिले.

इंडक्शन प्रोग्रामच्या दुसऱ्या सत्रात प्रसिद्ध प्रशिक्षक सुश्री प्रज्ञा अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली ३ तासांचे विशेष ‘सॉफ्ट स्किल्स वर्कशॉप’ (Soft Skills Workshop) आयोजित करण्यात आले होते. या कार्यशाळेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन MCA द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनी खुशी रे आणि समृद्धी पाटील यांनी केले. प्रा. सुष्टी हिंगे यांच्या कुशल समन्वयातून, तसेच MCA विभागातील सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.





