Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

राहुल गांधींच्या एका फोननंतर राहुल बोंद्रेंचा ‘यू-टर्न’? भाजप प्रवेशाचा निर्णय मागे घेतल्याची चर्चा

मुंबई | चिखली विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाच्या निर्णयाने बुलढाणा जिल्ह्यात मोठी राजकीय खळबळ उडवून दिली होती. मात्र, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी थेट दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा झाल्यानंतर बोंद्रे यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय तूर्तास मागे घेतल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राहिलेल्या राहुल बोंद्रे यांच्या पक्षांतराच्या चर्चा २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीपासूनच सुरू होत्या. स्थानिक राजकीय समीकरणे आणि भाजपमधील अंतर्गत मतभेदांमुळे हा प्रवेश रखडला होता. अखेर बोंद्रे यांनी माध्यमांसमोर काँग्रेसमधील प्रदीर्घ प्रवासाचा उल्लेख करत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय जाहीर केला. या भूमिकेमुळे बुलढाणा जिल्ह्यातील महायुती आणि महाविकास आघाडीच्या गणितांमध्ये मोठे फेरबदल होण्याची चिन्हे निर्माण झाली होती.

हेही वाचा

वैशाली राजीव रावळ यांना कराड तालुकास्तरीय ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’

राहुल गांधींच्या मध्यस्थीने रोखले पक्षांतर?

बोंद्रे यांनी भाजप प्रवेशाची घोषणा करताच काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवर तातडीने हालचाली सुरू झाल्या. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वतः बोंद्रे यांच्याशी फोनवरून संपर्क साधून त्यांची मनधरणी केल्याचे समोर येत आहे. या थेट संवादामध्ये पक्षातील त्यांच्या भूमिकेवर सकारात्मक चर्चा झाल्यानंतर बोंद्रे यांनी भाजप प्रवेश लांबणीवर टाकल्याचे किंवा तो निर्णय मागे घेतल्याचे समजते.

तसेच, काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी असलेली त्यांची राजकीय जवळीक आणि सपकाळ यांचा गृहजिल्हा बुलढाणा असल्याने, काँग्रेसच्या स्थानिक संघटनेवर याचा मोठा परिणाम होऊ नये यासाठी वरिष्ठ पातळीवरून ही सूत्रे वेगाने हलवण्यात आली. या ‘यू-टर्न’मुळे भाजपच्या गोटात मात्र काहीशी शांतता पसरली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group