Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय! हवामान विभागाचा ‘यलो’ अन् ‘ऑरेंज’ अलर्ट

Maharashtra Rain Alert | राज्यात ऑगस्ट महिना आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाने ओढ दिल्यानंतर अखेर शनिवारपासून मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा वेगाने गुजरातच्या दिशेने सरकत असल्याने निम्म्याहून अधिक महाराष्ट्रात वादळी पावसाचा प्रभाव दिसून येत आहे. हवामान विभागाने (IMD) उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’, तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

कमी दाबाचे क्षेत्र गुजरातच्या दिशेने जात असल्याने राज्याच्या उत्तर भागात पावसाचा जोर अधिक आहे. मागील २४ तासांत नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत जोरदार पावसाची नोंद झाली आहे. पुढील दोन दिवस हा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली असून, यामुळे पावसाची मोठी तूट भरून निघण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा

विद्यार्थ्यांच्या हातून साकारला पर्यावरणपूरक बाप्पा

आज कुठे कोणता अलर्ट?

नाशिक घाट विभाग, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. तर कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी; मध्य महाराष्ट्रातील नाशिक शहर, जळगाव, अहिल्यानगर, पुणे आणि पुणे घाट विभाग, सातारा आणि सातारा घाट परिसर; मराठवाड्यातील बीड, परभणी, हिंगोली, जालना; तसेच विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवत ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, रविवारी बहुतांश भागात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. पुढील ४८ तास पावसाची ही सक्रियता कायम राहून शेतकऱ्यांसह दुष्काळी भागांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group