Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा; माणगाव-इंदापूरमध्ये वाहतूक ठप्प

Mumbai Goa Highway | गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या लाखो चाकरमान्यांच्या प्रवासात शनिवारी सकाळी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण वाहतूक कोंडीचे विघ्न निर्माण झाले. उत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने मुंबई, ठाणे आणि उपनगरांतून हजारो वाहने एकाच वेळी कोकणाच्या दिशेने रवाना झाली आहेत. परिणामी, माणगाव आणि इंदापूर परिसरात वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या असून अवघे पाच ते सहा किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी प्रवाशांना पाऊण ते एक तासाचा वेळ लागत आहे.

माणगाव आणि इंदापूर येथील अपूर्ण राहिलेले बाह्यवळण रस्ते (बायपास), स्थानिक बाजारपेठांमधील अरुंद रस्ते आणि काही वाहनचालकांची घाईगडबड यामुळे वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. महामार्गावर वाहनांचा वेग कमालीचा मंदावला असून संथ गतीने चालणाऱ्या वाहतुकीमुळे चाकरमानी, लहान मुले आणि वृद्ध प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.

हेही वाचा

भारत विरुद्ध अफगाणिस्तान पहिला टी-२० सामना उद्या; जाणून घ्या वेळ, थेट प्रक्षेपण आणि दोन्ही संघ एका क्लिकवर!

अवजड वाहनांची बंदी झुगारल्याने कोंडीत भर

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने १६ टन किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या अवजड वाहनांना महामार्गावर बंदी घातली आहे. असे असतानाही महामार्गावर काही ट्रक आणि केमिकल टँकर सर्रास धावताना दिसून आल्याने वाहतूक कोंडी अधिकच बिकट बनली. महामार्गावर बंदोबस्तासाठी मोठा पोलीस फौजफाटा तैनात असून वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मात्र वाहनांचा प्रचंड ओघ पाहता नियमन करणे पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे. रायगड पोलिसांनी महामार्गावर वाहने उभी करण्यास (पार्किंग) सक्त मनाई केली असली, तरी पुढील दोन दिवसांत कोकणात जाणाऱ्या वाहनांची संख्या आणखी वाढणार असल्याने वाहतूक पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group