ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘आत्महत्येविषयीची कथा बदलूया – संवादाची सुरुवात करूया’ जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

पिंपरी-चिंचवड  : जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त लायन्स इंटरनॅशनल, डिस्ट्रिक्ट ३२३४ डी२ यांच्या वतीने ‘आत्महत्येविषयीची कथा बदलूया – संवादाची सुरुवात करूया’ या विषयावर महत्त्वपूर्ण जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी चिंचवड विद्यापीठ, मावळ, पुणे येथे करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक लायन्स क्लब ऑफ पुणे इनोव्हेशन असून क्लबचे अध्यक्ष लायन संदेश मुखेडकर यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये लायन्स क्लब ऑफ पूना निगडी, लायन्स क्लब ऑफ पुणे भोसरी आणि लायन्स क्लब ऑफ पुणे देहूरोड यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

कार्यक्रमास डॉ. संतोष सोनवणे, कुलगुरू, पिंपरी चिंचवड विद्यापीठ तसेच एमजेएफ लायन सलीम शिकलगार, विभागीय अध्यक्ष, विभाग ३ यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी एमजेएफ लायन रश्मी नायर, जिल्हा अध्यक्ष – मानसिक आरोग्य व कल्याण तसेच प्रा. रुचू कुथियाला, अधिष्ठाता व विभागप्रमुख, विज्ञान शाखा, पिंपरी चिंचवड विद्यापीठ यांचीही उपस्थिती होती.

कार्यक्रमास लायन्स क्लब ऑफ पुणे इनोव्हेशनचे अध्यक्ष लायन संदेश मुखेडकर, सचिव लिओ लायन अश्विन गुडसुरकर, खजिनदार प्रदीप रॉय,लायन संदीप मोरे,लिओ अध्यक्ष भूषण तरकसे, लिओ अभिषेक आडे व लिओ लिऑन कुटिन्हो उपस्थित होते.

तसेच लायन्स क्लब ऑफ पूना निगडीच्या अध्यक्ष लायन शिल्पी कुमार व लिओ अथर्व, लायन्स क्लब ऑफ पुणे भोसरीचे अध्यक्ष लायन अतुल बोरुळे व लायन शैलजा सांगळे , तसेच लायन्स क्लब ऑफ पुणे देहूरोडचे सचिव लायन व्यंकटथलापती यांचीही उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सन्निध्या मिसाळ मॅडम आणि रुची चंदन मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांशी संवाद साधणे, त्यांना कार्यक्रमात सहभागी करून घेणे तसेच कार्यक्रमाच्या सुरळीत आयोजनासाठी त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

हेही वाचा –  चहा-कॉफीप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी; अतिउष्ण पेयांमुळे अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका वाढण्याची शक्यता

कार्यक्रमातील प्रमुख मार्गदर्शक डॉ. संतोष चव्हाण, मानसोपचार तज्ज्ञ, ज्युपिटर हॉस्पिटल आणि डॉ. सौरभ चव्हाण, प्राध्यापक, मानसशास्त्रज्ञ व संस्थापक – हीलिंग हार्ट्स कौन्सेलिंग सर्व्हिसेस यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत मानसिक आरोग्य, तणाव, नैराश्य, भावनिक अडचणी आणि आत्महत्येच्या विचारांवर मात करण्यासाठी संवाद साधण्याचे तसेच योग्य वेळी मदत घेण्याचे महत्त्व समजावून सांगितले.

कार्यक्रमादरम्यान एमजेएफ लायन सलीम शिकलगार यांनी विद्यार्थ्यांना लायन्स इंटरनॅशनलच्या कार्याची व सेवाभावी उपक्रमांची माहिती दिली. समाजसेवेच्या माध्यमातून गरजू व्यक्तींना मदत करण्याबरोबरच देशाच्या आणि समाजाच्या प्रगतीत प्रत्येकाने आपले योगदान दिले पाहिजे, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. तसेच विद्यार्थ्यांनी लिओ क्लबमध्ये सहभागी होऊन सेवाकार्यात योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत तज्ज्ञांशी मनमोकळा संवाद साधला आणि विविध प्रश्न विचारले. ‘आत्महत्या हा कोणत्याही समस्येचा उपाय नाही; जीवन अमूल्य आहे’ हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात आला. विद्यार्थ्यांनी ‘आत्महत्येला नकार, जीवनाला होकार’ हा सकारात्मक संदेश स्वीकारत जीवनाला प्राधान्य देण्याचा संकल्प केला.

लायन्स क्लब ऑफ पुणे इनोव्हेशन यांच्या नेतृत्वाखाली आयोजित हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणारा, संवादाला प्रोत्साहन देणारा आणि आशा, आधार व जीवनमूल्यांचा सकारात्मक संदेश देणारा ठरला.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी लायन्स क्लब ऑफ पुणे इनोव्हेशनचे अध्यक्ष लायन संदेश मुखेडकर यांनी कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचे, मार्गदर्शकांचे, शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पिंपरी चिंचवड विद्यापीठाने दिलेल्या सहकार्याबद्दल विद्यापीठ प्रशासनाचे विशेष आभार व्यक्त केले. कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व लायन्स व लिओ सदस्यांचेही त्यांनी आभार मानले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group