Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
पुणे : कोढव्यांत दोन लहान मुली जलतरण तलावात बुडाल्या
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/3droen.jpg)
पुणे – सोसायटीच्या आवारात खेळणाऱ्या दोन मुली जलतरण तलावामध्ये पडून बुडाल्याची घटना रविवारी दुपारी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी बाराच्या सुमारास कोंढव्यातील तालाब कंपनीसमोरील एच. एम. सोसायटीमध्ये घडली. त्यांना तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून दोघीची तब्येतीत सुधारणा होत आहे. बतुल (वय 8) व हुसैना (3 महिने) मुसनसीर बाबरवाला अशी दोघींची नावे आहेत. घटनेनंतर त्यांना स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले, त्यानंतर पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.