Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

गणेशोत्सवात पुणे मेट्रोच्या वेळेत वाढ; अनंत चतुर्दशीला सलग २४ तास अखंड सेवा!

Pune Metro | पुणे मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दररोज सरासरी अडीच लाखांवर पोहोचल्याच्या पार्श्वभूमीवर ‘महामेट्रो’ने प्रवाशांच्या सोयीसाठी मोठा निर्णय घेतला आहे. ‘पीक अवर्स’मध्ये म्हणजेच सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेत आता दर पाच मिनिटांनी मेट्रो सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी वनाज ते रामवाडी या मार्गिकेवरील चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण झाल्या असून, स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड मार्गिकेवर सध्या चाचण्या सुरू आहेत. या चाचण्यांची प्रक्रिया पूर्ण होताच दर पाच मिनिटांच्या अंतराने मेट्रो सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध होईल, अशी माहिती महामेट्रोचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे.

सध्या सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ४ ते ८ या गर्दीच्या वेळेत दर ६ मिनिटांनी, तर इतर सामान्य वेळेत दर १० मिनिटांनी मेट्रो धावते. नव्या प्रस्तावानुसार, सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ४ ते ८ या वेळेत फेऱ्यांचा कालावधी ६ मिनिटांवरून ५ मिनिटांवर आणला जाणार आहे. चाचण्या पूर्ण होईपर्यंत सध्याच्या नियोजनानुसार गर्दीच्या वेळी दर सहा मिनिटांनीच सेवा सुरू राहील.

हेही वाचा

ॲपलचा मोठा धमाका! पहिलावहिला फोल्डेबल ‘iPhone Duo’ सादर; अत्याधुनिक A20 Pro चिप आणि ड्युअल डिस्प्लेसह किमतीचाही खुलासा

मेट्रोच्या फेऱ्यांचे वेळापत्रक

सकाळी ८ ते ११ (सध्या: दर ६ मिनिटांनी | प्रस्तावित: दर ५ मिनिटांनी),

सकाळी ११ ते सायंकाळी ४ (सध्या: दर १० मिनिटांनी | प्रस्तावित: दर १० मिनिटांनी),

सायंकाळी ४ ते ८ (सध्या: दर ६ मिनिटांनी | प्रस्तावित: दर ५ मिनिटांनी),

रात्री ८ ते ११ (सध्या: दर १० मिनिटांनी | प्रस्तावित: दर १० मिनिटांनी).

गणेशोत्सवात विसर्जनाच्या दिवशी २४ तास सेवा

आगामी गणेशोत्सवाच्या काळात भाविकांची होणारी अलोट गर्दी लक्षात घेऊन मेट्रोच्या वेळेत विशेष बदल करण्यात आले आहेत. उत्सवाच्या पहिल्या तीन दिवसांत नेहमीप्रमाणे रात्री ११ वाजेपर्यंत सेवा सुरू राहील. त्यानंतर पुढील दिवसांत रात्री १२ वाजेपर्यंत फेऱ्या वाढवण्यात येतील. तर अनंत चतुर्दशी म्हणजेच विसर्जनाच्या दिवशी मेट्रो सेवा सलग २४ तास अविरतपणे सुरू राहणार आहे.

प्रवासी संख्या आणि महसुलात मोठी वाढ

गेल्या आठवडाभरात १७ लाख ८३ हजार ९३९ प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला असून, त्यातून महामेट्रोला तब्बल २ कोटी ७१ लाख ४१ हजार ३७१ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे, शनिवारी (५ सप्टेंबर) एकाच दिवसात सर्वाधिक २ लाख ७७ हजार प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद झाली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group