ताज्या घडामोडीपुणे

आरकेएल गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांची ‘स्टेट लेव्हल २’ चॅम्पियनशिपमध्ये ऐतिहासिक कामगिरी; ‘टीम फारी सोती’ने पटकावले रौप्य पदक!

पुणे :  पिंपरी-चिंचवड येथील नामांकित ‘आरकेएल गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूल’च्या (RKL Galaxy International School) विद्यार्थ्यांनी आपल्या अद्भूत कौशल्याच्या जोरावर क्रीडा क्षेत्रात शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. नुकत्याच पार पडलेल्या ‘स्टेट लेव्हल २’ चॅम्पियनशिप अंतर्गत (चौथ्या राज्यस्तरीय महाराष्ट्र गतका चषक लाठीकाठी स्पर्धेत) शाळेच्या ‘अंडर-११’ (११ वर्षांखालील) वयोगटातील ‘टीम फारी सोती’ने (Team Fari Soti) उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन करत रौप्य पदक (Silver Medal) आपल्या नावावर केले.या संघात शाळेचे हुशार व तल्लख खेळाडू अर्जुन गव्हाळे (Arjun Gavhale), अपूर्व मौर्य (Apurv Maurya) आणि अद्वैत तापकीर (Advait Tapkir) यांचा समावेश होता.

हेही वाचा –  नात्यांपलीकडे जाऊन जपला ‘‘मायेचा धागा’’

या तिघांनीही मैदानावर दाखवलेले अप्रतिम टायमिंग, चपळता आणि सांघिक समन्वय यामुळे त्यांनी हे मोठे यश संपादन केले.शाळा व्यवस्थापनाकडून कौतुकाचा वर्षाव:विद्यार्थ्यांच्या या दैदीप्यमान यशाबद्दल आणि उत्कृष्ट कामगिरीबद्दल संस्थेचे चेअरमन श्री. रामनलाल कपूरचंद लुंकड, व्हाइस चेअरमन श्री. राजेंद्र आर. लुंकड, CEO व ॲकॅडमिक डायरेक्टर डॉ. पुष्कर चौबे, आणि ॲकॅडमिक डायरेक्टर/प्रिन्सिपल ज्योतिबा सुरवसे यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.याप्रसंगी बोलताना व्यवस्थापनाने सांगितले की, “हा विजय विद्यार्थ्यांची अफाट मेहनत, जिद्द आणि योग्य प्रशिक्षणाचे फळ आहे. या यशाने केवळ शाळेचेच नव्हे तर संपूर्ण परिसराचे नाव उंचावले आहे.” यासोबतच शाळेतील सर्व शिक्षकवृंद आणि पालकांनीही यशस्वी खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन केले व त्यांच्या पुढील उज्वल वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या.जिद्द आणि कष्टाला मिळाले फळ:लाठीकाठी सारख्या पारंपरिक आणि आव्हानात्मक खेळात राज्यपातळीवर चमकणे ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. आरकेएल स्कूल नेहमीच विद्यार्थ्यांच्या अभ्यासासोबतच त्यांच्या क्रीडा कौशल्यांना वाव देण्यासाठी कटिबद्ध राहिले आहे. ‘कीप शाइनिंग अँड कीप विनिंग’ (Keep Shining & Keep Winning) हाच संदेश देत संपूर्ण शाळेत सध्या आनंदाचे वातावरण पसरले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button