Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडीराष्ट्रिय

न्यूयॉर्कमध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांच्या कार्यक्रमाला विरोध; सभा रद्द करण्याची मागणी

Mohan Bhagwat | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान २९ ऑगस्ट रोजी न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे आयोजित कार्यक्रमाला न्यूयॉर्कचे महापौर झोहरान ममदानी यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. “मी अशा कोणत्याही विचारसरणी किंवा चळवळीच्या पूर्णपणे विरोधात आहे,” असे स्पष्ट करत त्यांनी या कार्यक्रमाला आपला पाठिंबा नसल्याचे जाहीर केले.

संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मोहन भागवत हे अमेरिका, कॅनडा आणि युकेमधील भारतीय समुदायाशी संवाद साधण्यासाठी विदेश दौऱ्यावर आहेत. ते अमेरिकेत दाखल झाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत महापौर ममदानी यांनी आपली भूमिका मांडली.

हेही वाचा

औषध निरीक्षक पदाचा पेपर फुटला; संपूर्ण भरती रद्द, आयोगाकडून फेरपरीक्षेची घोषणा

महापौर झोहरान ममदानी काय म्हणाले?

“हा एक खाजगी कार्यक्रम असल्याने त्यावर बंदी घालण्याचे अधिकार शहराला आहेत की नाही याची कल्पना नाही, मात्र मी या कार्यक्रमाला पाठिंबा देत नाही. या शहराचा पहिला भारतीय-अमेरिकन महापौर म्हणून मी सांगू इच्छितो की, भारताची खरी ओळख ही विविधतापूर्ण समाज आणि धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक अशी आहे. विशिष्ट घटकांना वगळणाऱ्या किंवा भेदभावावर आधारित चळवळीचा उदय त्रासदायक असून हे शहर जात, धर्म, पंथ किंवा रंगाचा भेद न करता प्रत्येकाचा सन्मान करते.”

इतर नागरी हक्क संघटनांचाही विरोध

केवळ महापौरांनीच नव्हे, तर ‘हिंदूज फॉर ह्युमन राइट्स’, ‘इंडियन अमेरिकन मुस्लिम कौन्सिल’ आणि ‘इंटरफेथ सेंटर ऑफ न्यूयॉर्क’ यांसारख्या विविध आंतरधर्मीय व नागरी हक्क संघटनांनी न्यूयॉर्क सिटी हॉलबाहेर पत्रकार परिषद घेत मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथील हा कार्यक्रम तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group