Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

दिल्ली विमानतळ, उच्च न्यायालयासह ६ प्रमुख ठिकाणी बॉम्बस्फोटाची धमकी

नवी दिल्ली | स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात कडक बंदोबस्त तैनात असतानाच राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. दिल्ली उच्च न्यायालय, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (IGI) विमानतळाचे टर्मिनल ३ यांसह शहरातील महत्त्वाच्या ६ आस्थापनांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी ईमेलद्वारे देण्यात आली आहे. या धमकीच्या मेलमध्ये लाल किल्ला, पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचाही धमकीवजा उल्लेख असल्याने सुरक्षा यंत्रणांमध्ये प्रचंड सतर्कता निर्माण झाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आस्थापनांना आलेल्या ईमेलमध्ये ‘दिल्ली खलिस्तान बनेल’ असा उल्लेख करत संभाव्य स्फोटांचा इशारा देण्यात आला होता. ज्या ६ महत्त्वाच्या ठिकाणी धमक्या मिळाल्या आहेत, त्यामध्ये दिल्ली उच्च न्यायालय, आयजीआय विमानतळाचे टर्मिनल ३, जामनगर हाऊस, झंडेवालान इमारत, साकेत येथील एक कार्यालय आणि दिल्ली कॅन्टोन्मेंटचे एसडीएम (SDM) कार्यालय यांचा समावेश आहे.

हेही वाचा

समाजहिताच्या उपक्रमांतून गणेश मंडळांचा आदर्शवत सहभाग; उपमहापौर शर्मिला बाबर

कसून शोधमोहीम सुरू; कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही

धमकीचे ईमेल्स प्राप्त होताच दिल्ली पोलीस, बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS), श्वान पथक आणि अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने संबंधित सर्व ठिकाणी दाखल झाल्या. परिसराची कसून तपासणी करण्यात आली असून प्राथमिक तपासात अद्याप कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. हा ईमेल नेमका कुठून पाठवण्यात आला आणि त्यामागील सूत्रधार कोण, याचा सायबर सेल व दिल्ली पोलिसांकडून वेगाने तपास सुरू आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button