Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

इंधन दरवाढीचा फटका! पिशवी बंद दूध २ रुपयांनी, दुग्धजन्य पदार्थ दहा टक्क्यांनी महागणार; मंगळवारपासून लागू होणार नवे दर

मुंबई : इंधनाच्या दरात वाढ झाल्यामुळे वाढलेला वाहतूक खर्च, वेष्टनासाठीच्या (पॅकिंग) कच्चा मालाच्या दरात वाढ होऊन वाढलेला वेष्टन खर्च आणि साखरेच्या दरात वाढ झाल्यामुळे गाई आणि म्हशीच्या पिशवी बंद दुधाच्या दरात दोन रुपयांनी तर दुग्धजन्य पदार्थांच्या दरात दहा टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय राज्यातील प्रमुख खासगी, सहकारी दूध संघांनी घेतला आहे, ही दरवाढ मंगळवारपासून ( ११ ऑगस्ट) लागू होणार आहे.

राज्यातील प्रमुख खासगी आणि सहकारी दूध संघांचा समावेश असलेल्या दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या सभासदांची बैठक शुक्रवारी पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, कात्रज डेअरी येथे संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत दरवाढीचा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा –  ‘अत्याधुनिक आरोग्य सुविधा प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यास शासन कटिबद्ध’; मंत्री प्रकाश आबिटकर

मागील काही दिवसांमध्ये डिझेल इंधनाच्या दरात प्रति लिटर १० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे वाहतूक खर्चात वाढ झाली आहे. आखाती युद्धामुळे वेष्टनासाठीच्या (पॅकिंग) कच्च्या मालाच्या दरात ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. प्रक्रिया जन्य पदार्थांसाठी आवश्यक असलेल्या साखरेच्या दरातही प्रति किलो १२ रुपयांनी वाढ झाली आहे.

त्या शिवाय महत्वाचे म्हणजे दूध खरेदी दरात यापूर्वीच वाढ झाली आहे, दूध खरेदी दरात पुढील काळात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खरेदी, प्रक्रिया, वेष्टन आणि वाहतूक दरात झालेल्या दरवाढीचा विचार करून दूध विक्री दरात सध्या प्रती लिटर २ रुपयांनी आणि दुग्धजन्य पदार्थांच्या दरात १० टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी मंगळवारपासून होणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button