माजी केंद्रीय मंत्र्याच्या मुलीने बँक मॅनेजरच्या कानशिलात लगावली; धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद

चेन्नई | तमिळनाडूची राजधानी चेन्नईमधून एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माजी केंद्रीय मंत्री एम. के. अलगिरी यांची मुलगी कायलविझी यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) बँक मॅनेजरच्या कानशिलात मारल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कायलविझी यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
नेमका काय घडला प्रकार?
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, ज्या इमारतीत बँकेचे कार्यालय आहे, ती इमारत कायलविझी यांच्या मालकीची आहे. बँकेच्या मॅनेजरने इमारतीमधील बिघडलेली लिफ्ट दुरुस्त करण्याची विनंती कायलविझी यांच्याकडे केली होती. याच कारणावरून बँक मॅनेजर आणि कायलविझी यांच्यात वादाला सुरुवात झाली.
नेतागिरी की धमक और बदसलूकी के बीच अपना फर्ज निभाते आम कर्मचारी का दर्द बयां करती यह CCTV फुटेज दिल दुखाने वाली है…
चेन्नई में महज एक लिफ्ट की खराबी की शिकायत पर पूर्व केंद्रीय मंत्री एम.के. अलागिरी की बेटी कयालविझी ने SBI के बैंक मैनेजर पर सरेआम थप्पड़ मार दिया.. मानो… pic.twitter.com/HOM0fo2Dgd
— Kishor Joshi (@KishorJoshi02) July 25, 2026
हेही वाचा
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांची शिक्षणमंत्री म्हणून नियुक्ती
सीसीटीव्ही फुटेजमध्ये कायलविझी एका पुरुषासोबत बँकेत येऊन मॅनेजरशी वाद घालताना स्पष्ट दिसत आहेत. दोघांमधील बाचाबाची इतकी वाढली की, संतापाच्या भरात कायलविझी यांनी थेट बँक मॅनेजरच्या कानशिलात लगावली.
पोलिसांत गुन्हा दाखल
या घटनेनंतर पीडित बँक मॅनेजरने तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेत कायलविझी यांच्याविरोधात तक्रार नोंदवली. बँक मॅनेजरच्या तक्रारीवरून आणि सीसीटीव्ही फुटेजचा पुरावा गृहीत धरून पोलिसांनी कायलविझी यांच्याविरोधात चार विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.




