Breaking-newsपिंपरी / चिंचवडमनोरंजनमहाराष्ट्र

‘देऊळ बंद-२’च्या निमित्ताने नगरसेवक राहुल कलाटे यांचा मराठी संस्कृतीच्या जतनासाठी पुढाकार!

वाकडमधील विशेष स्क्रीनिंगला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रवीण आणि स्नेहल तरडे यांच्या उपस्थितीने गर्दी

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी: वाकड, ताथवडे आणि पुनावळे परिसरातील नागरिकांना मराठी चित्रपटसृष्टीचा अनोखा अनुभव देत भाजपा नगरसेवक राहुलदादा कलाटे यांनी पुन्हा एकदा सामाजिक आणि सांस्कृतिक बांधिलकी जपल्याचे दिसून आले. त्यांच्या पुढाकारातून वाकड येथील INOX Megaplex, Phoenix Mall of the Millennium येथे मराठीतील सुपरहिट चित्रपट ‘देऊळ बंद-२’ च्या विशेष स्क्रीनिंगचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत राहुलदादा कलाटे यांच्या कार्याचे कौतुक केले.

राजकारणाबरोबरच सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही सक्रिय असलेल्या राहुलदादा कलाटे यांनी मराठी भाषा, कला आणि संस्कृतीच्या जतनासाठी हा उपक्रम राबविला. विशेष म्हणजे, या कार्यक्रमामुळे शेकडो नागरिकांना आपल्या कुटुंबासह मराठी चित्रपटाचा आनंद घेण्याची संधी मिळाली.

हेही वाचा –  सांगलीच्या अपघातग्रस्त वारकऱ्यांच्या मदतीसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील तत्पर

कार्यक्रमाला चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे तसेच अभिनेत्री स्नेहल तरडे यांनी विशेष उपस्थिती लावली. त्यांनी प्रेक्षकांशी संवाद साधत चित्रपटामागील कथा, त्याचा सामाजिक संदेश आणि मराठी चित्रपटसृष्टीच्या प्रवासाविषयी मनोगत व्यक्त केले. कलाकारांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

राहुल कलाटे यांनी यावेळी बोलताना, “मराठी संस्कृती आणि मराठी चित्रपटांना प्रोत्साहन देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. समाजाला विचार करायला लावणारे आणि सकारात्मक संदेश देणारे चित्रपट अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचले पाहिजेत,” असे मत व्यक्त केले. वाकड परिसरात विविध विकासकामांसोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून नागरिकांशी कायम संवाद ठेवणारे नेतृत्व म्हणून राहुलदादा कलाटे यांची ओळख निर्माण झाली आहे. ‘देऊळ बंद-२’च्या विशेष स्क्रीनिंगच्या माध्यमातून त्यांनी पुन्हा एकदा नागरिकांच्या मनात आपले वेगळे स्थान अधोरेखित केले.

Corporator Rahul Kalate takes the initiative to preserve Marathi culture through ‘Deool Band-2’!
Corporator Rahul Kalate takes the initiative to preserve Marathi culture through ‘Deool Band-2’!

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी राहुलदादा कलाटे यांच्या या उपक्रमाचे स्वागत करत भविष्यातही अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. मराठी चित्रपटसृष्टीला बळ देण्याच्या दिशेने उचललेले हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत होती.

“मराठी भाषा, संस्कृती आणि चित्रपटसृष्टी ही आपल्या अस्मितेची ओळख आहे. ‘देऊळ बंद-२’सारखे आशयघन चित्रपट समाजाला नवा विचार देतात. अशा कलाकृती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे. भविष्यातही सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांशी नाळ जपण्याचा माझा प्रयत्न कायम राहील.”
— राहुल कलाटे, नगरसेवक, भाजपा.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button