भारत-इंग्लंड ५ व्या टी-२० सामन्याची वेळ पुन्हा बदलली; जाणून घ्या कुठे पाहाल लाईव्ह

IND vs ENG | भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली आहे. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर, पुढील तिन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाला एकतर्फी पराभवाचा सामना करावा लागला. ब्रिस्टलच्या मैदानावर झालेला चौथा टी-२० सामना भारताने ९ गडी राखून गमावला. या पराभवासोबतच इंग्लंडने मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. आता इंग्लंडकडे शेवटचा सामना जिंकून भारताला ‘व्हॉइटवॉश’ करण्याची सुवर्णसंधी आहे, तर दुसरीकडे भारतीय संघ आपला पत राखण्यासाठी मैदानात उतरेल.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील शेवटचा सामना ११ जुलै, शनिवारी खेळवला जाणार आहे. हा सामना साऊथॅम्पटनच्याा द रोज बाऊल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरु होणार आहे. तर नाणेफेक अर्ध्या तासाआधी म्हणजेच, ६:३० वाजता होईल. मालिकेतील चौथा सामना रात्री १० वाजता सुरु झाला होता. हा सामना ३ तासांआधी सुरु होणार आहे. त्यामुळे भारतातील क्रिकेट चाहत्यांना २०-२० षटकांचा सामना पाहायला मिळेल.
हेही वाचा
ताथवडेतील JSPM कॉलेजच्या सांडपाण्याने सोसायटीधारक रहिवासी हैराण!
लाईव्ह सामना कुठे पाहायचा?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा टी-२० सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह पाहू शकता.यासह या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग तुम्ही जियो हॉटस्टारवर लाईव्ह पाहू शकता. पण जर तुमच्याकडे सब्सक्रिप्शन नसेल, तर तुम्ही हा सामना डीडी स्पोर्ट्सवर फ्री मध्ये पाहू शकता.
अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघ खालीलप्रमाणे:
भारतीय संघ : श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, इशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, प्रसिध कृष्णा, सूर्यांश शेडगे, वॉशिंग्टन सुंदर.
इंग्लंडचा संघ : हॅरी ब्रूक (कर्णधार), फिल सॉल्ट, जोस बटलर (यष्टीरक्षक), टॉम बँटन, जेकब बेथेल, सॅम करन, विल जॅक्स, जोफ्रा आर्चर, लियाम डॉसन, आदिल राशिद, जोश टंग, जॉर्डन कॉक्स, सोनी बेकर, ल्यूक वुड, साकिब महमूद, रेहान अहमद, जेम्स कोल्स.




