ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मुसळधार पावसातही डॉ. सुहास कांबळे यांची तत्पर लोकसेवा..!

डॉ. कांबळेंच्या पुढाकाराने पुणे–नाशिक महामार्गावरील वाहतूक सुरळीत

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

पुणे–नाशिक महामार्गावर साधुराम गार्डन मंगल कार्यालय समोरील परिसरात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. महामार्गावर पाणी साचून वाहतूक विस्कळीत झाल्याने वाहनचालकांसह नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. परिस्थितीची माहिती मिळताच नगरसेवक व शहर सुधारणा समिती सदस्य डॉ. सुहास कांबळे यांनी तातडीने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधत प्रत्यक्ष घटनास्थळी धाव घेतली.

डॉ. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या वतीने जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यालगतच्या नाल्यांची तात्काळ साफसफाई करण्यात आली. तसेच चेंबर होल खोलून साचलेल्या पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करण्यात आली. या जलद कारवाईमुळे काही वेळातच महामार्गावरील पाणी उतरू लागले आणि वाहतूक हळूहळू सुरळीत झाली.

हेही वाचा

’पीएमआरडीए’ची संकटमोचक टीम; शेकडो नागरिकांचे जीव वाचविण्यात यश!

दरम्यान, अतिवृष्टीमुळे प्रभाग क्रमांक आठमधील विविध भागांत पाणी साचणे, रस्त्यांवर चिखल होणे, नाले तुंबणे अशा अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. या सर्व अडचणी तातडीने सोडविण्यासाठी डॉ. सुहास कांबळे यांची टीम गेल्या दोन दिवसांपासून अहोरात्र काम करत आहे. पाणी निचऱ्यापासून ते नागरिकांच्या तक्रारींची तत्काळ दखल घेऊन उपाययोजना करण्यापर्यंत सर्व कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.

नगरसेवक स्वतः मैदानात उतरून परिस्थितीवर लक्ष ठेवत असल्याने आणि प्रशासनाला योग्य सूचना देत असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. “अडचणीच्या काळात नगरसेवक आणि त्यांची टीम आमच्या पाठीशी उभी राहिली,” अशी भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली. कार्यतत्पर आणि संवेदनशील लोकप्रतिनिधी म्हणून डॉ. सुहास कांबळे यांच्या जनसेवेच्या कार्याबद्दल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना अतिवृष्टीसारख्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांची सुरक्षितता आणि दैनंदिन जीवन सुरळीत ठेवणे हेच आमचे प्रथम कर्तव्य आहे. समस्या कागदावर न ठेवता प्रत्यक्ष मैदानात उतरून तातडीने त्या सोडवण्यावर आमचा भर आहे. प्रभाग 8 सह पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येक नागरिकाला दिलासा मिळेपर्यंत मी आणि माझ्या टीमची सेवा अखंड सुरू राहील.

– डॉ. सुहास कांबळे, नगरसेवक, शहर सुधारणा समिती सदस्य, पिं. चिं. मनपा

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button