Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडा

एमबाप्पेच्या गोलच्या जोरावर फ्रान्स उपांत्यपूर्व फेरीत; मात्र विजयानंतर मैदानात हाय-व्होल्टेज ड्रामा

FIFA World Cup 2026 | २०२६ फिफा विश्वचषकातील (FIFA World Cup 2026) राऊंड ऑफ-१६ च्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात फ्रान्सने पराग्वेचा १-० असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. फ्रान्सचा स्टार स्ट्रायकर आणि कर्णधार किलियन एमबाप्पेने ६९ व्या मिनिटाला पेनल्टीवर केलेला गोल या सामन्यात निर्णायक ठरला. या विजयासह फ्रान्सने पुढची फेरी गाठली असली, तरी सामना संपल्यानंतर मैदानावर घडलेल्या एका वादग्रस्त प्रकारामुळे सध्या क्रीडा जगतात मोठी चर्चा रंगली आहे.

सामन्याची अंतिम शिट्टी वाजल्यानंतर पराग्वेच्या गोलकिपरने रागाच्या भरात एमबाप्पेच्या पाठीवर चेंडू फेकून मारल्याने मैदानावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

अंतिम शिट्टीनंतर नक्की काय घडलं?

दोन वेळच्या विश्वविजेत्या फ्रान्सला ९० मिनिटे कडवी झुंज दिल्यानंतर पराग्वेला पराभवाचा सामना करावा लागला. सामना संपल्यानंतर पराग्वेचा गोलरक्षक ऑर्लॅंडो गिल हा एमबाप्पेचे अभिनंदन करण्यासाठी आणि हस्तांदोलन करण्यासाठी पुढे आला होता. मात्र, फ्रान्सचा कर्णधार एमबाप्पे हा विजयाचा जल्लोष साजरा करण्यात इतका मग्न होता की, त्याने गिलकडे दुर्लक्ष केल्यासारखे केले आणि तो पुढे निघून गेला.

आपला हा अपमान पराग्वेच्या गोलकिपरला सहन झाला नाही. या गोष्टीचा प्रचंड राग आल्याने गिलने हातातील बॉल थेट एमबाप्पेच्या पाठीवर फेकून मारला आणि तो तिथून निघून गेला. सुदैवाने, एमबाप्पेने या प्रकारावर कोणतीही आक्रमक प्रतिक्रिया न देता फ्रान्सच्या विजयाचा आनंद साजरा करणे सुरूच ठेवले. त्यामुळे हा वाद तिथेच मिटला, मात्र सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

हेही वाचा

‘एका झटक्यात इराणचं संपूर्ण नेतृत्व संपवू शकतो, पण..’; डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा इशारा

पॅराग्वेविरूद्धचा हा सामना फ्रान्ससाठी अजिबात सोपा नव्हता. पॅराग्वेने सुरुवातीपासूनच अत्यंत बचावात्मक (Defensive) पवित्रा घेत फ्रान्सच्या आक्रमणाचा वेग रोखून धरला होता. सामन्याच्या पहिल्या ६९ मिनिटांपर्यंत दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. पॅराग्वेचे खेळाडू वारंवार फाऊल करून फ्रान्सला शारीरिक संघर्षात अडकवण्याचा प्रयत्न करत होते.

अखेर ७० व्या मिनिटाला सामन्याला कलाटणी मिळाली. फ्रान्सचा खेळाडू डिझिरे डुए पेनल्टी क्षेत्रात धावत असताना पॅराग्वेच्या डिएगो गोमेझने त्याला चुकीच्या पद्धतीने टॅकल केले. सुरुवातीला पंचांनी खेळ सुरू ठेवला होता, मात्र व्हीएआर (VAR – Video Assistant Referee) तपासणीनंतर पंचांनी फ्रान्सला पेनल्टी बहाल केली. एमबाप्पेने या सुवर्णसंधीचे सोने करत चेंडू थेट गोलपोस्टमध्ये धाडला आणि फ्रान्सला १-० अशी विजयी आघाडी मिळवून दिली.

एमबाप्पेची मेस्सीच्या विक्रमाशी बरोबरी; १० जुलैला मोरोक्कोशी भिडणार

या सामन्यात केलेल्या महत्त्वपूर्ण गोलमुळे किलियन एमबाप्पे आता २०२६ फिफा विश्वचषकातील ‘गोल्डन बूट’च्या शर्यतीत लिओनेल मेस्सीच्या बरोबरीवर आला आहे. उपांत्यपूर्व फेरीत पोहोचलेल्या फ्रान्सचा पुढील सामना आता आफ्रिकन जायंट मोरोक्कोशी होणार आहे. हा हाय-व्होल्टेज सामना १० जुलै रोजी पहाटे १:३० वाजता खेळवला जाईल.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button