Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

खासगी रुग्णालयातील अवाढव्य उपचार खर्चावर मर्यादा येणार; आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची महत्त्वाची घोषणा

मुंबई : राज्यातील खासगी रुग्णालयांनी रुग्णांना विविध आजारांवरील उपचारांसाठी किती दर आकारावा, या संदर्भात राज्य सरकारने धोरण ठरवावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सर्व सदस्यांचीही तशीच मागणी आहे. त्या अनुषंगाने खासगी रुग्णालयातील उपचारांच्या दरांबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या बरोबर बैठक घेतली जाईल, अशी घोषणा आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत केली.

आमदार बापूसाहेब पठारे यांनी या बाबतचा प्रश्न लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थितीत केला होता. या वेळी झालेल्या चर्चेत नमिता मुंदडा, मनिषा चौधरी, सुलभा खोडके, श्वेता महाले, ज्योती गायकवाड, मुरजी पटेल, संजय केळकर, नितीन राऊत, सत्यजित देशमुख आदींनी सहभाग घेतला. मुदत पूर्व प्रसुती झालेल्या, कमी वजनाच्या बालकांना दीर्घकाळ एनआयसीयूमध्ये उपचारासाठी ठेवावे लागते. अनेक शहरांमध्ये ही सोय अपुरी आहे. ग्रामीण भागात ही सुविधाच नाही. उपचाराचा खर्च १५ ते २० लाखांवर जातो, हा खर्च सर्वसामान्यांना परवड नसल्याचा मुद्दा सदस्यांनी उपस्थितीत केला होता.

हेही वाचा –  वसंतराव नाईक कृषी पुरस्कार २०२६ जाहीर

आरोग्य विभागाने राज्यातील ६६ रुग्णालयाच्या ठिकाणी विशेष नवजात काळजी कक्ष स्थापन केला आहे. भविष्यात अशा कक्षांची संख्या वाढवली जाईल. एक समिती स्थापन करून समितीच्या अहवालानुसार उपचार पद्धतीबाबत दिशानिर्देश दिले जातील. बॉम्बे नर्सिंग कायद्यांतर्गत रुग्णालयाने आपले उपचार दरपत्रक रुग्णालयाबाहेर लावले पाहिजेत. सर्व धर्मादाय रुग्णालयांना उपचार खर्चाचा दर फलक दर्शनी भागात लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. असे फलक न लावणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई केली जाईल.

महापालिका आणि आरोग्य विभाग एकत्रीतपणे मोहीम राबवून कारवाई करेल, असेही आबिटकर यांनी सांगितले. पुणे जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लवकरच एक बैठक घेण्याची ग्वाहीही आबिटकर यांनी दिली. मुंबई उपनगरातील एकाही रुग्णालयाबाहेर उपचारांचे दरपत्रक लावलेले नाहीत. उपनगरात लहान मुलांचे एकही रुग्णालय नाही. रुग्णालयांसाठी शासकीय भूखंड आरक्षित आहेत, असे मुद्दे आमदार मुरजी पटेल यांनी यावेळी माडंले. त्यावर उत्तर देताना आबिटकर म्हणाले, मुंबईतील रुग्णालयाबाहेर उपचारांचे दर लावले जावेत यासाठी एक मोहीम हाती घेऊ, असे सांगितले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button