Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुण्यापाठोपाठ मुंबईत वरुणराजाचे आगमन! पुढील काही तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

Maharashtra Weather Update : मुंबईत वरुणराजाचे आगमन झाले आहे. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून मुंबईकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. सकाळपासून मुंबईतील काही ठिकाणी संततधार तर काही भागात मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. पुढील काही तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. राज्यात नैऋत्य मौसमी वाऱ्यांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असून मुंबईसह उपनगरात २४ जूनपर्यंत यलो अलर्ट जारी केला आहे.

या कालावधीत मध्यम स्वरूपाचा पाऊस, विजांचा कडकडाट, मेघगर्जना आणि ताशी ४० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईबरोबरच ठाणे, पालघर, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या आठवड्यात मान्सून अधिक सक्रिय होण्याची शक्यता आहे. विशेषतः २५ आणि २६ जूनदरम्यान मुंबईआणि परिसरात मुसळधार पाऊस पडू शकतो. 25 जूनपर्यंत मान्सूनचा जोर महाराष्ट्रात फारसा वाढणार नसला, तरी कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. विशेषतः दक्षिण कोकणात पावसाचा जोर अधिक असेल. त्यानंतर 25 जून ते 2 जुलै या कालावधीत मान्सूनचा प्रवास अधिक वेगाने होईल आणि उत्तर कोकणातही पावसाचा जोर वाढेल.

हेही वाचा –  रेशन कार्डचे नियम बदलले; आता कोणत्याही दुकानातून धान्य घेता येणार; रांगा आणि तुटवड्याचा त्रास संपणार

दरम्यान आज विदर्भातील अकोला, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये उष्ण लाटेचा प्रभाव कायम राहण्याचा अंदाज आहे. तसेच नागपूर, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत उष्ण हवामानासोबतच वादळी पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

याशिवाय पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, वर्धा आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून यलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित भागांत ढगाळ वातावरण, उकाडा आणि काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता कायम आहे. तर पुण्यात 23 ते 25 जून मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button