Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड “आयआयएम” शाखा उभारणीला “बुस्टर”

कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीत निशुल्क जागा प्रस्तावाला मान्यता

– भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या मागणीला मोठे यश

पिंपरी- चिंचवड | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि अभिमानास्पद बातमी आहे. शहरात ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’ (IIM) ची शाखा उभारणीला मोठा ‘बुस्टर’ मिळाला असून, राज्य सरकारच्या कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीत या संस्थेसाठी मोशी येथील शासकीय जागा निशुल्क देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी यासंदर्भात केलेल्या सातत्यपूर्ण मागणीला आणि पाठपुराव्याला मोठे यश आले आहे.

हेही वाचा –  व्ही. के. माटे हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

आयआयएम नागपूरची विस्तारीत शाखा पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथे व्हावी, यासाठी आमदार महेश लांडगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय आणि महसूल विभाग यांनी यासाठी आधीच सकारात्मकता दर्शवली होती. आता राज्य सरकारच्या कॅबिनेट मंजुरीमुळे या भव्य प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे.

पिंपरी-चिंचवड, पुणे आणि मुंबई ही मोठी शहरे जवळ असल्याने, तसेच येथील विशाल औद्योगिक पट्टा आणि आयटी हबचा विचार करता ‘कनेक्टिव्हिटी’च्या दृष्टीने मोशी येथील जागेची निवड करण्यात आली आहे. या वाढत्या नागरीकरणात राष्ट्रीय पातळीवरील व्यवस्थापन संस्था (IIM) शहरात येणे हे पिंपरी-चिंचवडच्या वैभवात भर घालणारे ठरणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“पिंपरी-चिंचवडला देशातील अग्रगण्य ‘एज्युकेशन हब’ (Education Hub) बनवणे हा आमचा संकल्प आहे आणि ‘आयआयएम’ (IIM) च्या रूपाने या संकल्पाला आज सर्वात मोठे बळ मिळाले आहे. आपल्या शहरात ही राष्ट्रीय स्तरावरील संस्था सुरू व्हावी, यासाठी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सुरुवातीपासूनच आम्हास सकारात्मक पाठबळ दिले आणि कॅबिनेट बैठकीत निशुल्क जागा मंजूर करून या स्वप्नाला गती दिली आहे. उद्योग, आयटी आणि उच्च शिक्षण यांचा हा त्रिवेणी संगम शहराच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी ठरेल!”

— महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी- चिंचवड, पुणे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button