Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महाडा इमारतीतील गॅलरीत अडकलेल्या विद्यार्थिनीची अग्निशामक दलाकडून सुखरूप सुटका

पिंपरी, प्रतिनिधी

संत तुकाराम नगर येथील महाडा इमारतीमध्ये राहणारी एक महाविद्यालयीन विद्यार्थिनी गॅलरीचा दरवाजा अचानक लॉक झाल्यामुळे गॅलरीत अडकून पडल्याची घटना आज पहाटे घडली. सकाळी सुमारे ५ ते ६ वाजण्याच्या दरम्यान घडलेल्या या प्रकारामुळे विद्यार्थिनी चांगलीच घाबरून गेली होती.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेविका सौ. सुजाता ताई पालांडे यांनी तात्काळ अग्निशामक दलाशी संपर्क साधून मदत मागवली. त्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक जवानांनी शिडीच्या सहाय्याने इमारतीच्या गॅलरीपर्यंत पोहोचत अत्यंत दक्षतेने बचावकार्य राबविले.

हेही वाचा –  देहू-आळंदी पंचक्रोशीला मिळणार ‘संतभूमी’चा दर्जा: आमदार शंकर जगताप

सुमारे दोन तासांच्या प्रयत्नांनंतर विद्यार्थिनीची सुखरूप सुटका करण्यात आली. या घटनेदरम्यान परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे कोणतीही जीवितहानी टळली.

या बचाव मोहिमेत प्रमुख अग्निशामक विठ्ठल सपकाळ, डी.सी.ओ. सत्यम चौकांडे, अग्निशामक दिग्विजय पवार, अक्षय खैरे, शुभम मुळीक, नागेश सरकाळे आणि राजदीप चव्हाण यांनी मोलाची कामगिरी बजावली.

तसेच सुनील पालांडे, प्रथमेश रूपनर आणि अनिकेत खेडेकर यांनीही विशेष सहकार्य केले. स्थानिक नागरिकांनी अग्निशामक दलाच्या तत्परतेचे तसेच नगरसेविका सौ. सुजाता ताई पालांडे यांच्या त्वरित हस्तक्षेपाचे कौतुक केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button