Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजन

रितेश देशमुखच्या नव्या शोमध्ये कोण-कोण दिसणार? प्रणित मोरे, शिल्पा शिंदेसह ‘या’ सेलिब्रिटींच्या नावाची चर्चा

Lock Upp 2 : बहुप्रतीक्षित रिॲलिटी शो ‘लॉक अप २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बिग बॉस मराठी होस्ट केल्यानंतर आता महाराष्ट्राचे लाडके रितेश भाऊ ‘लॉक अप २’ गाजवणार आहे. अलिकडेच या शोचे खास प्रोमो रिलीज झाले आहेत. तरूणाईमध्ये या शोची तुफान क्रेझ पाहायला मिळते. नेमकं या शोमध्ये काय घडणार, कोण-कोणते कलाकार दिसणार सर्व जाणून घेऊयात.

‘लॉक अप २’हा रिॲलिटी शो बॉलिवूड आणि मराठी अभिनेता रितेश देशमुख चित्रपट दिग्दर्शक फराह खानसोबत होस्ट करणार आहे. ‘लॉक अप २’ची धमाकेदार झलक पाहायला मिळाली आहे. या शो १४ सेलिब्रिटी पाहायला मिळणार आहेत. तसेच शोमध्ये २ जेल देखील आहेत. ‘लॉक अप’ च्या पहिल्या सीझनचे होस्टिंग बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत यांनी केले होते. ‘लॉक अप’ सीझन १ चा विजेता मुनव्वर फारुकी ठरला होता.

हेही वाचा –  राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘स्मार्ट उपस्थिती’, Botद्वारे ऑनलाईन हजेरी १५ जूनपासून अनिवार्य; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

सोशल मीडियावर रंगलेल्या चर्चेनुसार, ‘लॉक अप २’ या शोमध्ये ‘स्प्लिट्सव्हिला’चे फेम योगेश रावत आणि आकांक्षा चौधरी तसेच बिग बॉस फेम शिल्पा शिंदे, प्रणित मोरे, प्रियांका शर्मा, विकास गुप्ता, रश्मी देसाई, पुनीत , अर्चना गौतम, उर्वशी ढोलकिया, प्रणित मोरे, आसिम रियाझ, कुशा कपिला आणि हर्षद चोप्रा या कलाकारांच्या नावाची चर्चा पाहायला मिळत आहे. तसेच या नावांमध्ये टिव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री शिवांगी जोशी आणि प्रसिद्ध अभिनेता राम कपूर झळकणार असल्याचेही बोले जात आहे. बॉलिवूड अभिनेता गोविंदा यांची बायको सुनीता आहुजा यांच्या नावांचाही समावेश आहे. रणवीर इलाहाबादिया देखील शोमध्ये दिसू शकतो. मात्र अद्याप स्पर्धकांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली नाही.

‘लॉक अप २’ हा रिॲलिटी शो २७ जूनपासून सुरू होणार आहे. शनिवार ते बुधवार रात्री ८ वाजता नेटफ्लिक्सवर हा भन्नाट शो पाहायला मिळेल. चाहते या शोसाठी खूपच उत्सुक आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button