Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

फिफा वर्ल्डकप सुरू होण्यापूर्वी गडकरींची महत्वपूर्ण घोषणा, “नागपूरसह भारतात फुटबॉलचे आंतरराष्ट्रीय सामने…”

नागपूर : फिफा विश्वचषकाचा खुमार सध्या जगभरातील फुटबॉलप्रेमींच्या डोक्यावर चढला आहे. प्रत्येक चौकार, प्रत्येक गोल आणि प्रत्येक सामन्यातील थरार चाहत्यांना अक्षरशः खिळवून ठेवत आहे. सोशल मीडियावर आवडत्या संघांच्या चर्चा रंगत आहेत, तर मेस्सी, रोनाल्डो, एमबाप्पे यांसारख्या स्टार खेाडूंच्या कामगिरीकडे जगाचे लक्ष लागले आहे. शहरांमधील कॅफे, चौक आणि घराघरांत फुटबॉलच्या गप्पा रंगू लागल्या असून, रात्री उशिरापर्यंत सामने पाहण्याची चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यंदाचा विस्तारलेला स्पर्धा प्रारूप आणि जागतिक स्तरावरील वाढलेली लोकप्रियता यामुळे विश्वचषकाची रंगत आणखी वाढली आहे. फिपा विश्वचषक सुरू होण्याच्या काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी नागपूरसह भारतात तीन आंतरराष्ट्रीय सामने खेळविण्याबाबत महत्वपूर्ण घोषणा केली.

‘बार्सिलोना क्लब’कडून भारतात तीन सामने आयोजित करण्याचा प्रस्ताव असून आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूंनी नागपुरात खेळावे, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे गडकरींनी सांगितले. त्यासाठी यशवंत स्टेडियमचे आधुनिकीकरण करावे लागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नागपूर शहर देशाची क्रीडा राजधानी’ व्हावी, अशी इच्छा व्यक्त करत गडकरींनी शहरात मोठ्या प्रमाणावर क्रीडा सुविधा उभारण्याची घोषणा केली. पुढील वर्षी विदर्भस्तरीय खासदार क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात येणार असून त्यात एक लाखांहून अधिक खेळाडू सहभागी होतील, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा –  ‘मेहकर बसस्थानकाचे लोकार्पण; एसटीच्या आधुनिकीकरणाचा नवा टप्पा सुरू’; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

स्पेनमधील बार्सिलोना हा क्लब जगातील सर्वात लोकप्रिय आणि यशस्वी फुटबॉल संघांपैकी एक मानला जातो. १८९९ मध्ये स्थापन झालेल्या या क्लबने आपल्या आकर्षक आणि आक्रमक खेळशैलीमुळे फुटबॉलविश्वात वेगळी ओळख निर्माण केली. ‘मेस क्यू उन क्लब’ (केवळ एक क्लब नव्हे) हे ब्रीदवाक्य असलेल्या बार्सिलोनाचा कॅटालोनियाच्या सांस्कृतिक ओळखीशीही घट्ट संबंध आहे. ‘कॅम्प नोऊ’ हे त्यांचे ऐतिहासिक मैदान जगातील सर्वात मोठ्या फुटबॉल स्टेडियमपैकी एक मानले जाते.

जोहान क्रुइफ यांनी रुजविलेली ‘टिकी-टका’ शैली पुढे पेप गार्डिओला यांच्या काळात शिखरावर पोहोचली आणि त्यातूनच क्लबने अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जेतेपदे पटकावली. लिओनेल मेस्सी, झावी, इनिएस्ता, रोनाल्डिन्हो यांसारख्या दिग्गज खेळाडूंनी क्लबला जागतिक लोकप्रियतेच्या सर्वोच्च टप्प्यावर नेले. सध्या युवा खेळाडूंवर भर देत बार्सिलोना पुन्हा एकदा युरोपियन फुटबॉलमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील आहे. गडकरी यांच्या घोषणेमुळे भारतीय फुटबॉल चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button