ताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला ‘प्लॅटिनम सस्टेनेबल कॅम्पस पार्टनर’ सन्मान

शिक्षण विश्व : हैदराबाद येथील ग्लोबल पीस ऑडिटोरियम येथे कार्यक्रम

Share On

पिंपरी-चिंचवड | डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, आकुर्डी यांना पर्यावरण संवर्धन व शाश्वत विकास क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘प्लॅटिनम सस्टेनेबल कॅम्पस पार्टनर’ हा मानाचा बहुमान प्रदान करण्यात आला आहे. हा सन्मान रिसर्च हाइट्स फाउंडेशन व एन्व्हायर्नमेंट प्रोटेक्शन ट्रेनिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (EPTRI) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘भारत एन्व्हायर्नमेंट प्रोग्राम – भारत सस्टेनेबिलिटी कॅम्पस मिशन २०२६’ अंतर्गत प्रदान करण्यात आला.

जागतिक पृथ्वी सप्ताह (२२ ते २९ एप्रिल २०२६) निमित्त हैदराबाद येथील ग्लोबल पीस ऑडिटोरियम येथे आयोजित विशेष कार्यक्रमात महाविद्यालयाच्या वतीने डॉ. अशोक मोरे, डॉ. स्वाती जाधव आणि डॉ. सुहास पाटील यांनी सहभाग नोंदवून संस्थेच्या वतीने प्रमाणपत्र स्वीकारले. महाविद्यालयाने कॅम्पस परिसरात राबविलेल्या हरित उपक्रम, पर्यावरण जनजागृती, कचरा व्यवस्थापन, ऊर्जा बचत, जलसंधारण, प्लास्टिकमुक्त परिसर, विद्यार्थी सहभाग आणि शाश्वत विकासासाठी केलेल्या विविध प्रयत्नांची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.

हेही वाचा

To The Point: राज्यसभा निवडणूक। राष्ट्रवादीचे नेते खासदार पार्थ पवार यांचे ‘पॉलिटिकल बॅलन्स’

या यशाबद्दल डॉ डी वाय पाटिल शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष श्री. सतेज पाटील, डी वाय पाटिल प्रतिष्ठान चे विश्वस्त श्री. तेजस पाटील, संकुलाचे संचालक रीअर अॅडमिरल अमित विक्रम (निवृत्त), महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पी मालती, यांनी सर्व सहभागीचे अभिनंदन केले. हा सन्मान संस्थेच्या शाश्वत भारत घडविण्याच्या बांधिलकीची पावती असून भविष्यातही पर्यावरणपूरक उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. महाविद्यालयाच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button