ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पर्यावरण दिनानिमित्त दुर्गा देवी टेकडीवर वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन

स्वच्छ हरित पिंपरी चिंचवडकडे आणखी एक पाऊल; माझी वसुंधरा ७.० अभियानास ५ जून रोजी होणार सुरुवात

Share On

पिंपरी | पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि हरित शहर संकल्पनेला बळ देण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभाग तसेच, उद्यान विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘माझी वसुंधरा ७.०’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ शुक्रवारी (दि. ५) सकाळी ७.०० वाजता दुर्गा देवी टेकडी येथे होणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.

‘हरित पिंपरी चिंचवड, स्वच्छ पिंपरी चिंचवड’ या संकल्पनेवर आधारित या अभियानांतर्गत वृक्षारोपण, परिसर स्वच्छता, कचरा व्यवस्थापन तसेच विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. पर्यावरण संरक्षणासाठी सामूहिक सहभाग वाढविण्यावर या उपक्रमात विशेष भर देण्यात आला आहे.

शहर अधिक स्वच्छ, हरित आणि शाश्वत करण्याच्या उद्देशाने ‘माझी वसुंधरा ७.०’ अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत असून नागरिक, संस्था आणि विविध घटकांच्या सहभागातून या उपक्रमाला व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न महापालिकेकडून केला जात आहे.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे नमूद केले. पर्यावरण संरक्षण ही सामूहिक जबाबदारी आहे. वृक्षारोपण, स्वच्छता आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीच्या माध्यमातून शहर अधिक सुंदर आणि शाश्वत बनविण्याच्या प्रयत्नात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

हेही वाचा

प्रतीक्षा संपली! मान्सून केरळमध्ये दाखल; आता महाराष्ट्रात कधी धडकणार?

उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनीही अभियानात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले असून, पर्यावरणपूरक आणि स्वच्छ शहर घडविण्यासाठी प्रशासनासोबत नागरिकांचा सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. ‘माझी वसुंधरा ७.०’ अभियानातून पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती आणि प्रत्यक्ष कृती या दोन्ही बाबींना चालना मिळेल असेही ते म्हणाले.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पिंपरी चिंचवड शहराचे वैभव असलेल्या दुर्गा टेकडी येथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमात नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन वृक्षारोपण मोहिमेला हातभार लावावा, असे आवाहन मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे यांनी केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button