Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीउद्योग विश्व । व्यापारताज्या घडामोडी

देशात लवकरच प्लास्टिक नोटा; RBI चा काय प्लॅन?

RBI Plastic Notes: भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) देशात प्लास्टिक(पॉलिमर) नोटा आणण्याच्या विचारात आहे. मुंबई आणि पाटणा येथे केंद्रीय बँकेच्या बोर्डाची बैठक झाली. त्यात यावर गांभीर्याने विचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. गेल्या काही वर्षात नगदी नोटांची मागणी वाढली आहे. कागदी नोटा छपाईला मोठा खर्च येतो. तर त्या नोटा दीर्घकाळ टिकत नाहीत. त्या लवकर खराब होतात. या नोटा मळकट, फाटक्या आणि आजारांना आमंत्रण देणार्‍या ठरतात. त्यामुळे त्याला पर्याय आणण्याचा विचार सुरू आहे. लवकरच प्लास्टिक नोटांचा एक पायलट प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नुकत्याच समोर आलेल्या वार्षिक अहवालात (FY25) मोठा खुलासा झाला आहे. कागदी नोटा छापण्यासाठी 6,372.8 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. गेल्या आर्थिक वर्षात 5,101.4 कोटी रुपये खर्च आला होता. तज्ज्ञांच्या मते कागदाच्या तुलनेत प्लास्टिक नोटा छापणे हे दीर्घकाळासाठी फायदेशीर आहेत. तर एटीएम हे सुद्धा अद्ययावत झाले आहेत. त्यामुळे पॉलिमर नोटांची ओळख पटवणे आणि त्या बाहेर येण्याची प्रक्रिया सोपी असेल. तर या डुप्लिकेट नोटांना आळा घालण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

हेही वाचा –  IPL मध्ये स्मार्ट सनग्लासेस वर बंदी! BCCI चा मोठा निर्णय; नियम मोडल्यास कठोर कारवाईचा इशारा

अनेकदा तुमच्या हातातील नोटा या एकतर मळकट अथवा खराब असतात. काही नोटा टेपने जोडलेल्या असतात. काही फाटक्या असतात. त्याचा ही फटका आरबीआयला बसतो. आर्थिक वर्ष 2025 मध्ये 23.8 अब्ज खराब नोटा चलनातून बाहेर करण्यात आल्या. त्यात सर्वाधिक 500 रुपयांच्या नोटा होत्या. त्यानंतर 100 रुपयांच्या नोटांचा नंबर येतो. देशात डिजिटल पेमेंट वाढल्यानंतरही नोटांची मागणी कमी झालेली नाही. उलट ती वाढलेली आहे. 15 मेपर्यंत चलनातील एकूण नोटा (CiC) वार्षिक आधारावर 11.5 टक्क्यांनी वाढल्या. त्या 42.86 लाख कोटी रुपयांच्या उच्चांकी स्तरावर पोहचल्या. प्लास्टिक नोटा या दीर्घकाळ चालतात. त्या परत परत छापण्याची गरज भासत नाही. त्यामुळे मोठा खर्च वाचतो.

जगातील अनेक देशात प्लास्टिक नोटा व्यवहारात वापरल्या जातात. जगात सध्या जवळपास 60 देश पॉलिमर बँक नोटांचा वापर करण्यात येतो. जगात सर्वात अगोदर 1988 मध्ये ऑस्ट्रेलियाने 10 डॉलरची प्लास्टिक नोट छापली होती. त्यानंतर सिंगापुर, इंडोनेशिया, थायलंड, मलेशियापर्यंत अनेक देशात पास्टिक नोटांचा वापर होतो. युरोपमध्ये रोमानियाने 1998 मध्ये पहिल्यांदा प्लास्टिक नोटेचा वापर झाला. कॅनडामध्ये 2011 मध्ये प्लास्टिक नोटा चलनता आल्या. अमेरिकेत डॉलर पूर्णपणे प्लास्टिकचा नाही, तर काही नोटा या कॉटन-लिननच्या आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button